राष्ट्रीय क्रीडा दिन”निमित्त जी. एच. रायसोनीत क्रीडामहोत्सव

मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध खेळांचे रंगतदार आयोजन ; उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सन्मान जळगाव , ता. २९ : शिरसोली रस्त्यावरील जी. एच. रायसोनी महाविदयालय व सावखेडा परिसरातील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त ‘ राष्ट्रीय क्रीडा दिन ’ साजरा करण्यात आला. तसेच याप्रसंगी स्कूल व महाविद्यालयात राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या क्रीडापटूंचा सत्कार करण्यात आला. सुरवातीस महाविध्यालयात अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी नमूद केले कि , मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन देशभरामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने शारीरिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी व नागरिक यांनी आपल्या जीवनामध्ये मैदानी खेळाला महत्त्व दिले पाहिजे. विविध खेळ...