जी एच रायसोनी महाविद्यालयात “पिकलबॉल कोर्ट”चे भव्य उद्घाटन

जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये उभारण्यात आलेले हे पहिलेच पिकलबॉल कोर्ट : जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रवींद्र नाईक  

जळगाव, ता.०४ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय येथे नव्याने बांधलेल्या पिकलबॉल कोर्टचे उद्घाटन आज उत्साहात व जल्लोषात पार पडले. शारीरिक तंदुरुस्ती आणि खेळांप्रती विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण व्हावी, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या कोर्टच्या माध्यमातून महाविध्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात एक नवीन पर्व सुरू झाले असल्याचे मत उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, विद्यार्थ्यांची सर्वांगीण वाढ आणि विकासासाठी अभ्यासक्रम आणि सह-अभ्यासक्रमाचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे आणि या अनुषंगाने पिकलबॉल कोर्टचे उद्घाटनत्याचाच एक भाग असून, जी एच रायसोनी महाविद्यालयाचे विध्यार्थी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात अग्रेसर बनावे, यासाठी जी. एच. रायसोनी स्पोर्ट अँड कल्चरल फाउंडेशन विभागामार्फत सतत प्रयत्न सुरू असल्याचे सांगत या पिकलबॉल कोर्टच्या उभारणीसाठी मेहनत घेतलेल्या क्रीडा समन्वयकांचे त्यांनी अभिनंदन केले. तसेच पिकलबॉल कोर्टच्या स्थापनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थी केवळ स्पर्धात्मक खेळांसाठी नव्हे तर दररोजच्या व्यायामासाठीही प्रेरित होतील, अशी आशा व्यक्त करत, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन खेळ शिकण्याची उत्सुकता, क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि संघभावनेची वाढ निश्चितच घडून येईल व महाविध्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात झालेली ही नवीन भर भविष्यातील अनेक यशोगाथांचा पाया ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे व पिकलबॉल तसेच क्रिकेट नेटचे जळगाव जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रवींद्र नाईक यावेळी उपस्थित होते. त्यांनी फीत कापून या पिकलबॉल कोर्टचे उद्घाटन केले. आपल्या भाषणात त्यांनी नमूद केले कि, जी. एच. रायसोनी महाविद्यालय हे नेहमी विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविताना दिसते, पिकलबॉल कोर्ट जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये उभारण्यात आलेले पहिलेच कोर्ट असून, यामुळे रायसोनी महाविद्यालयातील तसेच संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडू व क्रीडाप्रेमींसाठी पिकलबॉल हा एक नवीन आणि प्रेरणादायी पर्याय उपलब्ध झाला असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार प्राप्त प्रवीण पाटील तसेच महाविध्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, क्रीडा संचालक सागर सोनवणे व महाविद्यालयातील सर्व विभागातील प्राध्यापक उपस्थित होते. उद्घाटनानंतर पिकलबॉल या खेळाची ओळख करून देण्यासाठी एक प्रात्यक्षिक सामना आयोजित करण्यात आला. कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे व विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. त्यांनी खेळातील चपळता, समन्वय आणि संघभावना याचे उत्तम प्रदर्शन केले. प्रेक्षकांनी त्यांच्या खेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश