जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात “अटल” अंतर्गत प्राध्यापकांना सायबर सुरक्षा व फॉरेन्सिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
सहा दिवसीय ऑनलाईन “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम” यशस्वीरीत्या संपन्न ; प्राध्यापकांच्या कौशल्यवृद्धीसाठी रायसोनी महाविद्यालयाचा उपक्रम यशस्वी
यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा व उद्दिष्टे समजावून सांगताना
जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले
कि, “सायबर सिक्युरिटी व फॉरेन्सिक सायन्स" हा या प्रशिक्षण
वर्गाचा मुख्य विषय असून प्राध्यापकांनी विध्यार्थ्यांना इनोव्हेशनसाठी एंकरेज
करावे व आधी स्वता अपडेट रहावे यासाठी हा विषय हाती घेतल्याचे सांगितले तसेच
तंत्रज्ञान, संशोधन आणि अध्यापन पद्धती सतत बदलत असतात. उत्तम
अध्यापनासाठी केवळ विषयाचे ज्ञान पुरेसे नसते, तर
विद्यार्थ्यांपर्यंत ते प्रभावीपणे पोहोचवण्याचे कौशल्यही लागते व उद्योग जगतातील
बदल तसेच गरजा लक्षात घेऊन प्राध्यापकांना नवीन ट्रेंड्स, संकल्पना, संशोधन पद्धती
याबद्दल माहिती मिळावी व सॉफ्ट स्किल्स, संशोधन लेखन, इनोव्हेशन, स्टार्टअप, एआय, डेटा सायन्स अशा
नव्या कौशल्यांचे प्रशिक्षण प्राध्यापकांना मिळावे या अनुषंगाने जी. एच. रायसोनी
महाविद्यालयात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी
म्हटले. या सहा दिवसीय उपक्रमात सायबरसुरक्षा, डिजिटल
फॉरेन्सिक्सचा परिचय, वास्तविक सायबर घटनांचे केस स्टडी
विश्लेषण, फॉरेन्सिक तपास, एआय, एमएल, ब्लॉकचेनवरील लाईव्ह डेमो, एथिकल हॅकिंग, पेनिट्रेशन टेस्टिंग तसेच सायबर सुरक्षा व डिजिटल
फॉरेन्सिक्समधील कायदेशीर आणि नैतिक पैलू अशा विविध विषयांवर सखोल सत्रे आयोजित
करण्यात आली.तसेच संगणक नेटवर्कची सुरक्षितता, फायरवॉल
व्यवस्थापन, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन, डेटा इन्क्रिप्शन, पेनिट्रेशन टेस्टिंग यांसह विविध सायबर हल्ल्यांचे
प्रत्यक्ष डेमो पाहण्याची संधी मिळाली. हटवलेला डेटा पुनर्प्राप्त करणे, लॉग फाइल तपासणे, हॅकरचा मागोवा
घेणे, नेटवर्क आणि
मोबाईल फॉरेन्सिक्स याविषयी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. प्रशिक्षणादरम्यान
अत्याधुनिक साधनांचा वापर करून नेटवर्क स्कॅनिंग, डेटा विश्लेषण व
तपासणी करण्याचे कौशल्य शिकवण्यात आले. याशिवाय डिजिटल पुरावे हाताळण्यातील
कायदेशीर प्रक्रिया आणि व्यावसायिक नैतिकतेची माहिती प्राध्यापकांना देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापकांना सायबर सिक्युरिटी
अॅनालिस्ट, एथिकल हॅकर, नेटवर्क
सिक्युरिटी इंजिनियर, डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट, सायबर क्राईम तपास अधिकारी अशा विविध विषयांवर सखोल सत्रे
आयोजित करण्यात आली.
या सहा दिवसीय उपक्रमातील सत्रांमध्ये छत्रपती संभाजीनगर
येथील गव्हर्नमेंट फॉरेन्सिक सायन्स संस्थेचे डिजिटल आणि सायबर फॉरेन्सिक विभागाचे
प्रमुख. डॉ. चरणसिंग एन. कायटे, सायबर फॉरेन्सिक्स
विभागातील डॉ. शोभा बाविस्कर, फॉरेन्सिक कायदा
विभागप्रमुख डॉ. राहुल भारती, नाशिक येथील सायबर
फॉरेन्सिक एक्सपर्ट श्री. तन्मय एस दीक्षित, वर्धा येथील दत्ता
मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थेतील प्राध्यापक डॉ. दीपक शर्मा, डेटा अॅनालिटिक्समधील वरिष्ठ तज्ञ व एलटीआय माइंडट्रीचे
श्री. शुभम काबरे,
राम अँटीव्हायरस प्रायव्हेट लिमिटेडचे
संचालक श्री. कल्याण दाणी, पुणे येथील
सावित्रीबाई फुले विद्यापीठातील आयटी सर्व्हिसचे संचालक डॉ. नितीन पाटील, यूएसए येथील सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट पंकज लढे, तसेच आशुतोष म्हेसकर या विविध तज्ज्ञांनी
मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डीन अकॅडेमिक डॉ. संजय
शेखावत, एमसीए विभाग प्रमुख व एफडीपी समन्वयक
प्रा. कल्याणी नेवे यांच्या
मार्गदर्शनाखाली प्रा. रुपाली ढाके, एफडीपी सह समन्वयक
प्रा. करिष्मा चौधरी, प्रा. मानसी तळेले, प्रा. श्रुतिका साळवे, प्रा. प्रतीक्षा पाटील, प्रा. शुभम अडवाल, प्रा. प्रिया टेकवानी व प्रा. निकी वेद आणि प्रा. राहुल खंडारकर यांनी सहकार्य केले.

Comments
Post a Comment