प्रा. रोहित साळुंखे “व्यवस्थापन” विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण
जळगाव, ता. ०४ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील बिजनेस मॅनेजमेंट विभागातील प्राध्यापक रोहित यशवंत साळुंखे हे व्यवस्थापन विषयातून महाराष्ट्र सेट परीक्षा नुकतेच उत्तीर्ण झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच लागला. त्यात प्राध्यापक साळुंखे यांना हे यश मिळाले.
जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमीक डीन
प्रा. डॉ. संजय शेखावत व एमबीए विभागप्रमुख प्रा. योगिता पाटील यांचे त्यांना
मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे
सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment