एमबीए सीईटीच्या तयारीसाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “निःशुल्क ऑनलाइन मॉक – सीईटी टेस्ट”
रँक १ ते ३० मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या टॉपर्सना मिळणार रोख पारितोषिके ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले विध्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव
ता. २३ : महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (स्टेट सीईटी
सेल) २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी एमबीए सीईटीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी एमबीए
पदव्युत्तर प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा देणे
अनिवार्य असल्याने या परीक्षेसाठी ज्या विध्यार्थ्यानी अर्ज केले असतील अशा
विध्यार्थ्यांसाठी शहरातील नामांकित स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ
इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाने या प्रवेश परीक्षेची तयारी व
विध्यार्थ्यांचे मनोबल वाढावे यासाठी दिनांक ३० मार्च रोजी “निःशुल्क ऑनलाइन मॉक –
सीईटी टेस्ट” आयोजित केली आहे.
या
परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या लॉजिकल रिझनींग, व्हर्बल
ऍबिलिटी, काँटॅटेटीव्ह ऍप्टिट्यूड अशा विविध मुद्यांवर
विध्यार्थ्यांचा अधिक भर वाढावा व स्टेट सीईटी सेलच्या परीक्षेत उत्तमत्तोम स्कोर
मिळावा या उद्देशाने या मॉक – सीईटी टेस्ट मधील रँक १ ते ३० क्रमाने उत्तीर्ण
होणाऱ्या प्रत्येक टॉपर्सना रँक १ : रुपये ५०००/-, रँक २ : रुपये ३०००/, रँक ३ : रुपये १५००/-, रँक ४ ते १० : रुपये ७५०/- व
रँक ११ ते ३० मधील परीक्षार्थींना रुपये ५००/- प्रमाणे रोख पारितोषिके बक्षीसे
स्वरुपात देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
तरी या
निःशुल्क ऑनलाइन मॉक – सीईटी टेस्टच्या सुवर्णसंधीचा लाभ स्टेट सीईटी सेलच्या
परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावा असे आवाहन जी. एच. रायसोनी
इस्टिट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले आहे. या उपक्रमाची
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी प्रा.रफिक शेख, प्रा.डॉ.विशाल राणा व प्रा.तन्मय भाले
यांच्या ९८२३३३७८६२,९६५७७२४०८३ व
९२८४४८५३५८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment