जी. एच. रायसोनी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
मराठमोळ्या संस्कृतीचे घडले दर्शन तसेच ‘छत्रपती शिवाजी’ या सजीव देखाव्याने भारावले विध्यार्थी
जळगाव, ता. १७ : पारंपारिक वेशभूषा केलेले असंख्य
विद्यार्थी,महाराष्ट्र
धर्माचे प्रतीक असलेले असंख्य भगवे झेंडे, शिवरायांच्या पराक्रमाची गीते, जय शिवराय या गगनभेदी घोषणां आणि छत्रपती
शिवाजी महाराजांची पालखी अशा आगळ्यावेगळ्या पारंपरिक पध्दतीने जी. एच. रायसोनी
कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात सोमवार ता. १७ रोजी तिथीनुसार “शिवजयंती” सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराजांच्या मिरवणूकीने कार्यक्रमाची सुरुवात
झाली. याप्रसंगी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल, अकॅडेमिक डीन
प्रा. डॉ. संजय शेखावत, प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी व मोठ्या
संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या सोहळ्याचे प्रास्ताविक करतांना
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी म्हटले कि, छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी योध्दा तर होतेच पण या पराक्रमाबरोबरच व्यवस्थापनाच्या
दृष्टीकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांकडे उत्कृष्ट नेतृत्व गुण, प्रशासन क्षमता, निर्दोष नियोजन कौशल्य आणि विलक्षण
दृष्टी होती ते काळाच्या पुढे होते. त्यानी सदैव काळाच्या पलीकडे पाहिले, त्यांनी त्याच्या काळात उद्योग, जलसंधारण, जलसंवर्धन, पर्यावरण, शब्दकोष आणि शिवकालीन तलाव यांची विशेष
व्यवस्था केली होती. “पाणी आडवा पाणी जिरवा” हा उपक्रम शिवाजी
महाराजांनी पहिल्यांदा आपल्या काळात राबविला. त्याचबरोबर दुष्काळ निवारण्याची
यंत्रणाही त्यांच्या काळात महाराजांनीच राबविली तसेच
राष्ट्रप्रेमाची भावना, स्त्रियांबद्दल
आदरभाव आणि पराक्रम या त्रिसूत्रीची देणगी छत्रपतींनी आपल्या स्वकर्तृत्त्वातून
स्वराज्याच्या रयतेला दिली असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील विध्यार्थी व विद्यार्थींनींनी ‘छत्रपती शिवाजी’ या
कार्यक्रमावर सांस्कृतिक प्रात्यक्षिके सादर केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रा वसीम पटेल
यांच्या नेतृत्वाखाली कन्हैया चौधरी, भाग्येश चौधरी, तुषार पाटील, श्रेयश शेजवळ, रिया तळेले, रिया भंगाळे, निनाद गव्हाळे, रोहित मराठे, निखिल मिस्तारी, यश ठाकरे व मंजिरी भोळे या स्टुडंट कौन्सिलच्या
विद्यार्थ्यांनी केले तर सूत्रसंचालन भाविका घाटे व स्वागत आणि आभार देवश्री भक्कड या विध्यार्थीनीने मानले. सदर शिव महोत्सवाचे यशस्वीरीत्या
आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी
यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment