Posts

Showing posts from March, 2025

एमबीए सीईटीच्या तयारीसाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “निःशुल्क ऑनलाइन मॉक – सीईटी टेस्ट”

Image
रँक १ ते ३० मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या टॉपर्सना मिळणार रोख पारितोषिके ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले विध्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन जळगाव ता. २३ : महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (स्टेट सीईटी सेल) २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी एमबीए सीईटीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी एमबीए पदव्युत्तर प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असल्याने या परीक्षेसाठी ज्या विध्यार्थ्यानी अर्ज केले असतील अशा विध्यार्थ्यांसाठी शहरातील नामांकित स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाने या प्रवेश परीक्षेची तयारी व विध्यार्थ्यांचे मनोबल वाढावे यासाठी दिनांक ३० मार्च रोजी “निःशुल्क ऑनलाइन मॉक – सीईटी टेस्ट” आयोजित केली आहे. या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या लॉजिकल रिझनींग , व्हर्बल ऍबिलिटी , काँटॅटेटीव्ह ऍप्टिट्यूड अशा विविध मुद्यांवर विध्यार्थ्यांचा अधिक भर वाढावा व स्टेट सीईटी सेलच्या परीक्षेत उत्तमत्तोम स्कोर मिळावा या उद्देशाने या मॉक – सीईटी टेस्ट मधील रँक १ ते ३० क्रमाने उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक टॉप...

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात "विद्यार्थी गुणगौरव समारंभ"

Image
विद्यार्थ्यांचा विविध श्रेणींमध्ये ८८ हून अधिक बक्षिसे व प्रशस्तीपत्र देऊन गौरव ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते बक्षीस वितरण जळगाव , ता. २४   : येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचा “वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ” नुकताच पार पडला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत , एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील, सिव्हील अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ.   शंतनू पवार , मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील , संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील , इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील व डेटा सायन्स-आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. स्वाती पाटील, एमसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे, ॲडमिशन डीन प्रा. रफिक शेख आदी या प्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकॅडमिक डीन...

जी. एच. रायसोनीच्या “टेक्नोरीओन -२०२५” स्पर्धेतून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना कौशल्यवाढीचा बूस्टर

Image
तांत्रिक कलांचा आविष्कार ; विविध महाविद्यालयातील ४९६ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग तसेच ५१ हजार रकमेची रोख पारितोषिके वितरीत जळगाव , ता. २१  : विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचे दर्शन घडविणाऱ्या “टेक्नोरीओन – २०२५” हा उपक्रम जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ता. २१ मार्च शुक्रवार रोजी या राष्ट्रीय स्तरावरील “टेक्नोरीओन” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचे स्वयंसंशोधीत नवनविन उपकरणांचे मॉडेल्स , प्रोजेक्‍ट एक्झ‌िक्यूशन याचे प्रमुख आकर्षण होते. जी. एच. रायसोनी महाविद्यालयात दरवर्षाप्रमाणे यंदाही “टेक्नोरीओन” हा राष्ट्रीय इव्हेंट घेण्यात आला असून यामध्ये १५ च्यावर अभ‌ियांत्रिकी महाविद्यालयातील ४९६ हून अध‌िक विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, सिव्हील अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ.  शंतनू पवार, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद ...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

Image
मराठमोळ्या संस्कृतीचे घडले दर्शन तसेच ‘छत्रपती शिवाजी’ या सजीव देखाव्याने भारावले विध्यार्थी जळगाव , ता. १७ : पारंपारिक वेशभूषा केलेले असंख्य विद्यार्थी , महाराष्ट्र धर्माचे प्रतीक असलेले असंख्य भगवे झेंडे , शिवरायांच्या पराक्रमाची गीते , जय शिवराय या गगनभेदी घोषणां आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी अशा आगळ्यावेगळ्या पारंपरिक पध्दतीने जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात सोमवार ता. १७ रोजी तिथीनुसार “ शिवजयंती ” सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. महाराजांच्या मिरवणूकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत , प्राध्यापक - प्राध्यापकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या सोहळ्याचे प्रास्ताविक करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी म्हटले कि , छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी योध्दा तर होते च पण या पराक्रमाबरोबरच व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांकडे उत्कृष्ट नेतृत्व गुण , प्रशासन क्षमता , निर्दोष नियोजन...