जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न

जळगाव, ता. ९  : जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये प्राथमिक वर्गाच्या विध्यार्थ्याची शिक्षक-पालकसभा आयोजित करण्यात आली होती. पालकसभेला जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा या उपस्थित होते. शनिवार दि. ६ रोजी ऑफलाईन पद्धतीने शिक्षक-पालकसभा आयोजित करण्यात आली होती. यात ज्यूनिअर केजी व सिनिअर केजीच्या विध्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सुरवातीस शिक्षिका निकिता जैन यांनी प्रास्ताविकेत उपस्थित पालकांचे स्वागत केले. यानंतर मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी स्कूलच्या उपक्रमांबाबत पालकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचा घरी अभ्यास कसा घ्यावा. त्यांचा शब्दसंग्रह कशाप्रकारे वाढवावा. सभोवतालचे ज्ञान कसे द्यावे याबद्दल सांगितले. वहीवर, पाटीवर लिहिण्याचा सराव करणे तसेच स्कूलमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धां बद्दल माहिती दिली. यासह सर्व पालकांना आजच्या काळात विद्यार्थी व पालक यांचे नाते कशा प्रमाणे असायला हवे , पालकांच्या जबाबदार्‍या काय याविषयी मार्गदर्शन करत बालकांचा आहार व पालकांच्या आदर्शकृती याविषयी सांगितले तसेच प्राथमिक पालकसभेच्या सुरुवातीला शाळेत राबवले गेलेले विविध उपक्रम, स्पर्धा, अभ्यासासंदर्भातील अॅक्टीव्हीटी या बाबतची माहिती दिली. पालकांनी शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम तसेच स्कूलमध्ये राबवला जात असलेला पौष्टीक आहार उपक्रम याविषयी शिक्षकांचे कौतुक केले. तसेच पालकांच्या समस्याचे निरसन स्कूलच्या मुख्याध्यापीका तेजल ओझा यांनी केले. पालक सभेच्या यशस्वीतेसाठी स्कूलच्या शिक्षक व स्कूल कमिटी सदस्य यांचे मागदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी पब्लिक स्कूलचे  संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश