जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “जागतिक डॉक्टर्स डे” उत्साहात साजरा
दंत तपासणी शिबाराचे आयोजन करत “डॉक्टरांचे आपल्या जीवनातील महत्व” या विषयावर विध्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
जळगाव, ता. ४ : १ जुलै हा दिवस भारतात डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. या अनुशंगाने जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “जागतिक डॉक्टर्स दिन” मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टर्स डे चे औचित्य साधून शालेय विध्यार्थ्यासाठी दंत तपासणी शिबीर, डॉक्टरांचे महत्व या विषयावर कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
सदर कार्यक्रमात सर्वप्रथम जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका
तेजल ओझा यांच्या हस्ते
उपस्थित डॉक्टर मान्यवरांचा शाल नारळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून आजच्या या
दिवशी या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
तसेच मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी १ जुलै हा दिवस डॉक्टरांच्या समर्पणावर भर देतो, आयुष्यभर लाखो लोकांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांचा मोलाचा वाटा असतो आणि हा दिवस त्यांच्या कार्याचे कौतुक करते आणि मानवी जीवनातील डॉक्टरांच्या भूमिकेचा सन्मान करते असे नमूद केले. यावेळी काही विध्यार्थ्यानी डॉक्टरांची वेशभूषा साकारली होती. विध्यार्थ्यानी वैद्यकीय व्यवसाय समजून घेण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शाळेतील शिक्षिका वर्षा मोहिते यांनी केले तर सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment