“युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज” या विषयावर जी. एच. रायसोनी महाविध्यालयात तीन दिवसीय कार्यशाळा
“एआयसीटीई”च्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा संपन्न ; जिल्हातील विविध महाविध्यालयातून ७० प्राध्यापकांचा सहभाग
जळगाव, ता. १ : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद आणि जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “वैश्विक मानवी मूल्य” या विषयावर तीन दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मानवी सह-अस्तित्व, सौहार्द, सुसंवाद याविषयी तज्ञांनी मार्गदर्शन केले.
कवयित्री
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील रजिस्ट्रार डॉ. विनोद पाटील,
जी.
एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल,
अकॅडमिक
डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एआयसीटीईचे
समन्वयक डॉ. प्रशांत दायगव्हाणे व मुख्य वक्ते डॉ. महेश कोलते यांच्या हस्ते या
कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. जी. एच. रायसोनी महाविध्यालयातील भव्य सभागृह
येथे एमबीए विभागातर्फे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या
प्रास्ताविकेत जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल
यांनी नमूद केले कि, नवीन शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक सूचनानुसार
दोन ते चार क्रेडीटचा कोर्स “युनिव्हर्सल
ह्युमन व्हॅल्यूज” या विषयावर नियोजित करण्यात आला असून हा कोर्स
शिकवण्याकरिता युनिव्हर्सल व्हमुन व्हॅल्यूज प्रमाणित प्राध्यापक निश्चित करण्यात
आले आहे, त्यामुळे या संदर्भाची दखल घेत “एआयसीटीई”च्या संयुक्त
विद्यमाने कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील
प्राध्यापकासाठी हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. आता
या कार्यशाळेतील सर्व प्राध्यापक हा कोर्स शिकविण्यासाठी आता पात्र झाले असून
आमच्या जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “एआयसीटीई”
च्यावतीने
विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्ये रुजविण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.
त्या अंतर्गत विविध कार्यशाळा आयोजित करण्यात येतात, विद्यार्थ्यांमध्ये
मानवी मूल्य रुजवणे हि काळाची गरज असून आदर्श समाज घडविण्यासाठी हा तीन दिवसीय
फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम हाती घेतला आहे. सत्य,
योग्य
कृती, शांती, प्रेम आणि अहिंसा ही मूळ मूल्ये मुलांमध्ये
रुजवणे आणि ही मूल्ये त्यांच्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करणे हे
लक्ष्य या कार्यशाळेतून मिळालेल्या मुलमंत्रातून आमच्या महाविध्यालयातील
प्राध्यापक विध्यार्थ्यापर्यंत पोहोचविणार आहे. मुळात मानवी मूल्ये रुजवण्यात
कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका अत्यंत
महत्वाची असते. पूर्वी एकत्रित कुटुंबामुळे घरातील एख्याद्याला मानसिक ताण जाणवत
नव्हता परंतु आता लहान कुटुंबामुळे हा ताण वाढायला लागला आहे,
मानवी
मुल्यांचा विसर आजच्या पिढीला पडत चालला आहे, वैश्विक मानवी
मूल्यांचे शिक्षण देणे हे एक चॅलेज निर्माण झाले आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक
धोरणाच्या अंतर्गत “एआयसीटीई”ने “वैश्विक मानवी
मूल्ये” सक्तीने केलेले मार्गदर्शक शिक्षण खरोखर
अभिनंदनीय बाब असून जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी
यांच्या मार्गदर्शनामुळे व प्रोत्साहनातून हि कार्यशाळा आयोजित करू शकलो असेहि
त्यांनी सांगितले.
यानंतर कार्यशाळेचे उद्घाटक कबचौ विद्यापीठातील रजिस्ट्रार डॉ. विनोद पाटील यांनी म्हटले कि, आजच्या तरुणांसाठी नैतिक आदर्श कशासाठी आहेत हे ठामपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. गुन्हेगारीमुक्त व यशस्वी समाज घडवायचा असेल तर आजच्या काळात विध्यार्थ्यांना “वैश्विक मानवी मूल्ये” चे धडे देणे गरजेचे बनले आहे आणि हिच बाब ओळखून भारत सरकारची अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद ही देशातील पदविका अभ्यासक्रमामध्ये सुसूत्रता व दर्जा राखण्यासाठी त्यांनी व्यापक विचारमंथन घडवून “वैश्विक मानवी मूल्ये” चे ठोस धोरण बनविले आहे. तसेच जी. एच. रायसोनी महाविध्यालयाने आयोजित केलेल्या या तीन दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममुळे जिल्ह्यातील शिक्षक व प्राध्यापकांना एक नवी उर्जा मिळेल व वैश्विक मानवी मूल्यांचे डॉ. महेश कोलते यांचे सखोल मार्गदर्शन प्राध्यापकांना नक्कीच उपयोगी पडेल असे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले. यानंतर कार्यशाळेच्या आभार प्रदर्शनात अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी नमूद केले कि, विद्यार्थ्यामध्ये वैश्विक नैतिक मूल्य विकसित करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे खात्रीने एक सकारात्मक बदल झालेला दिसून येईल, “एआयसीटीई”ची हि संकल्पना जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात राबविण्यात आली आणि त्यात कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयातील सुमारे ७० प्राध्यापकानी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला हि खरोखर कौतुकास्पद बाब असून महाविध्यालयात प्रवेशित विध्यार्थ्यांसाठी “वैश्विक मानवी मूल्ये” देणारी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट हे एक व्यापक शिक्षण देणारी संस्था ठरेल यात शंका नाही असे त्यांनी नमूद केले. या संपूर्ण कार्यशाळेचे नियोजन व समन्वय एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील यांनी केले तर प्रा. कविता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Comments
Post a Comment