जी. एच. रायसोनी महाविद्यालयात भव्य “वृक्षारोपण” उपक्रम

असंख्य विध्यार्थ्यांनी घेतली वृक्षसंवर्धनाची शपथ ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ फोटो ओळ : रायसोनी महाविध्यालयात वृक्षारोपण करताना रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल जळगाव , ता. २९ : स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यासह सर्व प्राध्यापक प्रध्यापकेत्तर कर्मचारी व विध्यार्थ्यानी पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने पाऊल टाकत महाविद्यालय परिसरात १८० झाडांची लागवड केली. या वेळी संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाल्या की , ‘ प्रत्येकाने झाडे लावले पाहिजे आणि त्याचे संवर्धन केले पाहिजे. वृक्षलागवड आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. ’ प्रत्येक विध्यार्थ्याने एका झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी , असे आवाहन देखील त्यांनी या वेळी केले. या उपक्रमावेळी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची शपथ विध्यार्थांकडून घेण्यात आली तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन स्थापत्य अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यानी केले. या वेळी सिव्हील अभियांत...