स्किल बेस्ड “एनपीटीईएल कोर्स” मध्ये जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचे १४ विध्यार्थी अख्ख्या भारतातून “अव्वल”
६० टक्के अभ्यासक्रम प्रत्यक्ष, तर ४० टक्के “ऑनलाईन शिक्षण” देण्यावर महाविद्यालयाचा भर ; टॉपर्स विध्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक
जळगाव, ता. २० : एमएचआरडी व एआयसीटीई द्वारे दिशादर्शक व वित्तपुरवठा केलेला हा उपक्रम असून आय.आय.टी.च्या समनव्यातुन घडलेल्या ऑनलाईन एनपीटीईएलने जानेवारी ते एप्रिल सत्राचा निकाल जाहीर केला आहे. यात संपूर्ण भारतातून ९५६ विध्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. यापैकी ८५२ विद्यार्थ्यांना यश मिळाले असून त्यात जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील १३ विध्यार्थी व १ प्राध्यापक हे राष्ट्रीय स्तरावर कोर्स टॉपर झाले आहेत.
नवीन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महाविध्यालयीन अभ्यासक्रमात अनेक आमूलाग्र बदल करण्यात
आले आहेत. 60 टक्के अभ्यासक्रम प्रत्यक्ष, तर 40 टक्के ऑनलाईन शिक्षण देण्याचा यात समावेश
असून या बाबीचा मागोवा घेत शहरातील जी. एच. रायसोनी महाविध्यालय हे एकमेव एनईपीची
पॉलिसी १०० टक्के राबवीत असून खानदेशातील विविध भागातील विध्यार्थ्यांना हि एक
अमुल्य संधी देत त्याच धर्तीवर नुकतेच जी. एच. रायसोनी महाविध्यालयातील
विध्यार्थ्यानी आपल्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त ऑनलाईन एनपीटीईएलचे विविध कोर्स
केले तसेच प्राध्यापकांनी देखील या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत किमान दहा
कोर्स केले व एनपीटीईएलमध्ये आपला सहभाग नोंदवत या सत्रात उत्तुंग कामगिरी करत
संपूर्ण भारतात जी. एच. रायसोनी महाविध्यालयाचा ठसा उमठवला. या अनुषंगाने “अव्वल” ठरलेल्या या विध्यार्थ्याचा
महाविद्यालयाच्या वतीने जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती
अग्रवाल, अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व सर्व
विभागप्रमुखांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी विध्यार्थ्याचे
कौतुक करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी म्हटले कि, आम्ही प्रभावीरित्या नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवीत असून यात जी.
एच. रायसोनी महाविद्यालय १०० टक्क्यापैकी ४० टक्के अभ्यासक्रम हा विध्यार्थ्यांना
त्याच्या पसंतीचे कोर्सेस घेवून ऑनलाईन पूर्ण करण्याची संधी देत असून स्कीलबेस
शिक्षणावर अधिक भर यात देण्यात येत आहे. आज कौशल्यावर आधारित शिक्षण ही पर्याय
नसून काळाची गरज आहे. मुळात महाविद्यालयातील अभ्यासक्रमाचे काही ठराविक मर्यादा
असतात त्यात दरवेळी बदल करणे शक्य होत नाही या अनुषंगाने विध्यार्थ्यांच्या
पसंतीचे स्कीलबेस शिक्षण देणे महत्वाचे आहे. यानुसार इंडस्ट्री रेलेवेंट कोर्सेस
विद्यार्थ्यांनी या एनपीटीईएलच्या माध्यमातून पूर्ण केलेले असून या उपक्रमामुळे
रायसोनी महाविध्यालयातील विध्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात स्कील डेव्हलपमेट होत
असून ज्या विध्यार्थी व्यावसायिकांना त्यांचे करिअर पुढे न्यायचे किंवा ज्या
विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता वाढवायची आहे त्यांच्यासाठी “एनपीटीईएल कोर्स” हे अत्यंत उपयुक्त व दिशादर्शक अभ्यासक्रम
आहे तसेच विध्यार्थ्यांना महाविध्यालयाने ठरविल्याप्रमाणे दोन क्रेडिटचा फायदा होत
असल्याने ते या कोर्ससाठी गंभीरतेने पुढे सरसावतात व त्यांना या कोर्सचा अधिकधीक
फायदा कसा होईल यासाठी जी. एच. रायसोनी महाविध्यालयातील एक स्वतंत्र विभाग यासाठी
सतत काम करीत असते असे सांगत त्यांनी यशस्वी विध्यार्थ्यामुळेच महाविद्यालयाचे नाव
मोठे होते. सदर परीक्षेत टॉपर ठरलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या उपलब्ध
साधन सामग्रीचा, वाचन साहित्यांचा लाभ घेऊन अनुभवी
प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले असून विध्यार्थ्यांच्या
सर्वांगीण विकासाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट वर्षभर विविध उपक्रम राबवीत
असल्याचे सांगितले. या यशामुळे शिक्षण क्षेत्रात रायसोनी इन्स्टिट्यूटची मान आणखी
उंचावली असून जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी व
कार्यकारी संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे
अभिनंदन केले आहे.
हे आहेत “राष्ट्रीय टॉपर्स”
जी. एच. रायसोनी महाविध्यालयातील आदित्य सुभाष अंभोरे
(इ-बिजनेस), देवेंद्र सुनील अहिरे
(इ-बिजनेस),देवेंद्र शिवकुमार पाटील
(इ-बिजनेस), दिपक किरण पाटील (इ-बिजनेस), हर्षल योगेश चौधरी
(इ-बिजनेस), कौस्तुभ तत्पुजे (इ-बिजनेस), निकिता महेश कुरकुरे
(इ-बिजनेस), यशराज विद्याधर पाटील
(इ-बिजनेस), शेख अनस जलिस अजहर
(इ-बिजनेस), ध्रुव जितेंद्र लोटवाला
(ट्रेनिंग एंड डेवलपमेंट),
प्रतिश दिवाकर कुलकर्णी (ट्रेनिंग एंड डेवलपमेंट), प्रथमेश जगदीश कासार
(ट्रेनिंग एंड डेवलपमेंट),
प्रिती साहा (ट्रेनिंग एंड डेवलपमेंट) व प्रा. योगेश प्रकाश वंजारी
(ट्रेनिंग एंड डेवलपमेंट) या १ प्राध्यापक व १३ विध्यार्थ्यानी इ-बिजनेस व
ट्रेनिंग एंड डेवलपमेंट या विषयातील परीक्षेत घवघवीत यश संपदान करत या विविध
कोर्सेसमध्ये मोठ्याप्रमाणात शिकायला मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.
काय आहे “एनपीटीईएल कोर्स”
नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्स्ड लर्निंग
(एन.पी.टी.ई.एल.) या उपक्रमाची सुरुवात सात आयआयटी (मुंबई, दिल्ली, कानपूर, खरगपूर, मद्रास, गुवाहाटी व रुरकी) आणि
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरु (आयआयएससी) यांच्या पुढाकारानं २००३ साली झाली.
इंजिनीअरिंग आणि मुलभूत विज्ञान शाखेतील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील
अभ्यासक्रमांवर आधारित वेब व व्हिडीओ कोर्सेस सुरुवातीच्या काळात उपलब्ध करुन
देण्यात आले होते. यामध्ये कालांतरानं पदव्युत्तर मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमांचा
देखील समावेश झाला. एन.पी.टी.ई.एलने विद्यार्थ्यांना रोजगारासाठी तयार करण्यासाठी
आणि योग्य त्या उच्च शिक्षणाकडे जाण्यास मदत व्हावी या हेतूनं काही ऑनलाइन
अभ्यासक्रमांची योजना केली असून ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून ४, ८ वा १२ आठवड्यांचे ऑनलाइन
अभ्यासक्रम उपलब्ध केले आहेत. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या पदवी आणि
पदव्युत्तर अभ्यासक्रमांशी सुसंगत असून तंत्रज्ञान वर्धित शिक्षणविषयक या
राष्ट्रीय उपक्रमात समावेश आहे
एनपीटीईएल डोमेन प्रमाणपत्र
हे देखील महाविद्यालयात विध्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले असून आपल्या अभ्यासक्रमां व्यतिरिक्त स्वारस्य असलेल्या विषयात/क्षेत्रात कौशल्य मिळवण्यासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय या ३ वर्षात एनपीटीईएल डोमेन प्रमाणपत्र पूर्ण करता येते. उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या विध्यार्थ्याला ७ कोर्स करायचे आहे त्यानुसार ८ सेमिस्टर असतील तर प्रत्येक सेमिस्टरमध्ये एक एक पूर्ण केल्यास तर त्या विध्यार्थ्याला अखेरीस एनपीटीईएल डोमेन प्रमाणपत्र मिळते, म्हणजेच कि एखादा विध्यार्थी स्थापत्य विभागाचा असेल आणि त्याला विद्युत विभागातील एखाद्या विषयाचा अभ्यासक्रम शिकायचा झाल्यास, तो विध्यार्थी त्याला ठरवून दिल्याप्रमाणे तो अभ्यासक्रम आवडीने शिकेल व त्याला त्या विषयात स्पेशलायझेशनचे अजून एक प्रमाणपत्र मिळेल अशी आखणी या कोर्सची करण्यात आली असून हेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि त्यानुसार जी. एच. रायसोनी महाविध्यालयात विध्यार्थीभिमुख अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.
Comments
Post a Comment