जी. एच. रायसोनी महाविध्यालयात ‘स्वीप’तर्फे मतदान जनजागृती कार्यक्रम

चुनाव का पर्व देश का गर्व हे ब्रीद म्हणत मतदानाची केली जनजागृती ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल याचे मार्गदर्शन

जळगाव, ता. ११ : जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाने व जिल्हा स्वीप समितीच्या वतीने जळगाव जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी तारीख तेरा, मतदान मेरा असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी यांच्या उपस्थितीत मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नवीन पात्र मतदारांची नोंदणी वाढवणे तसेच जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी स्वीप अर्थात मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हा एक स्तुत्य उपक्रम असून प्रत्येक मतदाराचे मत हे महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजावत मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे प्रतिपादन संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. पुढे त्या म्हणाल्या कि, प्रत्येक पाच वर्षांनी आपल्याला लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपला हक्क बजावण्याची संधी येते त्यामुळे मतदान करून आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे. यानंतर महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढावी, त्या प्रक्रियेचे ज्ञान प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे, मतदान प्रक्रियेत सामान्य मतदाराचा सहभाग वाढावा, लोकशाहीला खऱ्या अर्थाने लोकसहभागात्मक लोकशाही बनविणे हा स्वीपचा मूळ उद्देश असून समाजमाध्यमांद्वारे देखील मतदार जनजागृतीचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. अमोल जोशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वोटर हेल्पलाइन अॅ बद्दल माहिती दिली तसेच जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे व्यवस्थापन सदस्य गणेश पाटील यांनी मतदार नोंदणी मतदार जनजागृतीसाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश