जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा शनिवारी “पदवीदान समारंभ”
विविध विद्याशाखेतील ७१२ स्नातकांना करण्यात येणार पदवी प्रदान ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांची माहिती
जळगाव, ता. १६ : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाचा दुसरा २०२२-२३ या वर्षाचा “पदवीदान समारंभ” दिनांक २० एप्रिल २०२४, शनिवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या प्रशस्त अश्या ऑडीटोरीयममध्ये सकाळी ११ च्या सुमारास हा सोहळा पार पडणार असून या सोहळ्याला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे हे अध्यक्षीय भाषण करणार आहेत तर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट, जळगावचे अॅडव्हायझरी बोर्ड व आयक्यूएसीचे मेंबर सिए दर्शन जैन हे उपस्थित स्तानकांना उपदेश देणार आहे. तसेच रायसोनी ग्रुप ऑफ इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, बोर्ड ऑफ गव्हर्नन्स मेंबर प्रमोद संचेती, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व परीक्षा नियंत्रक गौरव तिवारी यासह बोर्ड ऑफ स्टडी व अकॅडमिक कोंसीलचे मेंबर हे प्रमुख पाहुणे म्हणून या समारंभास उपस्थित राहणार असल्याची माहिती रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी दिली. तसेच या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांसमवेत पालकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले
या समारंभात एकूण ७१२ विद्यार्थ्यांना
पदवी प्रदान करण्यात येणार असून यामध्ये एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए, बी.ई.-आयटी, बी.ई.-ई अँड टी सी, बी.ई.-ईई, बी.ई.-सीई, बी.ई.-एमई, बी.ई.-सीएसई असे सर्व शाखेचे एकूण ७१२
विद्यार्थ्यांचा या पदवीदान समारंभात समावेश असल्याची माहिती जी. एच. रायसोनी
महाविद्यालयाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून देण्यात आली.
११ विद्यार्थ्यांनी केली “सुवर्ण पदकां”ची कमाई
निखिल किरण पाटील (एमबीए), शेफाली नामदेव मंधान (एमएमएस), आचल संजय कांकरिया (एमसीए), कांचन भास्कर माळी (बीबीए), ममता भाऊसाहेब पाटील (बीसीए), माधुरी ज्ञानेश्वर घुगे (बी.ई.-सीएसई), सय्यद शाहनवाझ अमिनुद्दीन (बी.ई.-आयटी)
दिपक महावीर सैनी (बी.ई.-एमई), कार्तिक
महेश पाटील (बी.ई.-सीई), शुभम सुसंता रॉय (बी.ई.-ईई), पल्लवी प्रदिप सुर्वे (बी.ई.-ई अँड टी
सी)
Comments
Post a Comment