जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे मराठी भाषा गौरव दिवस विविध उपक्रमांनी साजरा
विध्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग ; मुख्याध्यापिका तेजल ओझा यांचे मार्गदर्शन
जळगाव, ता. २७ : जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये ‘जागतिक मराठी भाषा दिन’ विविध उपक्रमासह उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात शाळेच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या हस्ते कुसुमाग्रज व छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमा व शिल्प पूजनाने करण्यात आली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘हीच एक प्रार्थना’ हे गीत ‘एक सूर एक ताल’ या संकल्पनेतून सादर केले. आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन येत असतो आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व आपल्याला माहित असणे गरजेचे असते. म्हणूनच आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व सांगण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मराठी बाणा आणि मराठीची धन्यता दाखवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘लाभले आम्हास भाग्य’या गीतावर नृत्य सादर करण्यात आले.यानंतर मराठी वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवात विविध कला सादर केली व पसायदान म्हटले तसेच यावेळी अध्यक्षीय भाषणातून जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देऊन, मराठी ही आपली मातृभाषा असल्याने, तिचे संवर्धन करणे हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. असे सांगत मराठी भाषा काल- आज आणि उद्या कशी असेल यासंदर्भात देखील त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या दरम्यान, विद्यार्थ्यांनी ‘शिवराज्यभिषेक’ हे शिवरायांच्या जीवनावर आधारीत जनजागृतीपर नाटक सादर केले. सूत्रसंचालन कार्तिक हिरे व उजेशा चौधरी या विध्यार्थ्यानी केले तर संयोजन स्कूलचे व्यवस्थापक प्रशांत महाशब्दे यांनी केले.
Comments
Post a Comment