एमबीए सीईटीच्या तयारीसाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयात "क्रॅश कोर्स"

क्रॅश कोर्स मध्ये विविध विषयांचे तज्ञ देणार सीईटीचा स्कोर वाढविण्यावर भर ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विध्यार्थ्यांना सहभागी होण्याचे केले आवाहन

जळगाव ता. २३ : महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (स्टेट सीईटी सेल) २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी एमबीए व एमसीए सीईटीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी एमबीए पदव्युत्तर प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असल्याने या परीक्षेसाठी ज्या विध्यार्थ्यानी अर्ज केले असतील अशा विध्यार्थ्यांसाठी शहरातील नामांकित जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाने या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी दिनांक  २० फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत क्रॅश कोर्सचे आयोजन केले असून या क्रॅश कोर्समध्ये विविध विषयांचे तज्ञ विध्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत तसेच या परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या लॉजिकल रिझनींग, व्हर्बल ऍबिलिटी, काँटॅटेटीव्ह ऍप्टिट्यूड अशा विविध मुद्यांवर या कोर्स मध्ये भर देण्यात येणार आहे व स्टेट सीईटी सेलच्या परीक्षेत उत्तमत्तोम स्कोर कसा मिळवावा यासाठीही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पुढील महाविद्यालयीन प्रवेशासाठी व स्कॉलरशिप मिळवण्यासाठी सीईटीचा स्कोर हा विध्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. सदर सीईटी दिल्याशिवाय पदव्युत्तर प्रवेश व स्कॉलरशिप मिळत नाही त्या अनुषंगाने जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या क्रॅश कोर्सच्या सुवर्णसंधीचा लाभ स्टेट सीईटी सेलच्या परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावा असे आवाहन रायसोनी इस्टिट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले आहे. या क्रॅश कोर्सच्या अधिक माहितीसाठी प्रा.रफिक शेख, प्रा.डॉ.विशाल राणा व प्रा.डॉ.जितेंद्र जमादार यांच्या ९८२३३३७८६२ व ९४२३४५७७३१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश