उद्या जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलतर्फे “सजग पालकत्व”वर व्याख्यान

प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व लाईफ कोच डॉ. रोझिना राणा हे करणार मार्गदर्शन ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे पालकांना उपस्थितीचे आवाहन

जळगाव, ता. २९ : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलतर्फे उद्या ता. २३ शनीवार रोजी सकाळी ठीक ११ वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर येथील प्रसिद्ध ज्येष्ठ बाल मानसोपचार तज्ज्ञ व लाईफ कोच डॉ. रोझिना राणा हे उपस्थितांशी वाढत्या आधुनिकतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेले अस्थिरतेचे व अध्ययनातील अडथळ्यांचे प्रमाण, समस्याग्रस्त मुलांशी कसे वागावे, आपल्याला त्यांची मदत कशी करता येईल, या विविध विषयावर संवाद साधणार असून दुपारच्या सत्रात शिरसोली रोडवरील  जी. एच. रायसोनी महाविद्यालयात देखील दुपारी ठीक ४.३० वाजता या व्याख्यानाला प्रारंभ होणार आहे.

डॉ. रोझिना राणा यांची लेखक, संघटक आणि एचआर ट्रेनर अशीही ओळख असून, गेल्या २० वर्षापासून त्या विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक आदीचे समुपदेशन करण्याचे काम निरंतर करीत आहे. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटतर्फे वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमांतर्गत हे व्याख्यान होणार असून, डॉ. रोझिना राणा हे त्यांच्या मानसोपचार विषयातील विविध अनुभव व सजग पालकत्वचे मुद्दे आपल्या व्याख्यानातून मांडणार आहेत. या अनुषंगाने या व्याख्यान कार्यक्रमात सर्व पालक,शिक्षक व नागरिकानी उपस्थित राहून लाभ घ्यावाअसे आवाहन जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी व संचालक श्रेयसजी रायसोनी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश