जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “कश्ती” या विद्यापीठस्तरीय “मॅनेजमेंट फेस्ट”चे आयोजन

विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग ; नाविन्यता व उद्योजकतेवर विविध स्पर्धा संपन्न जळगाव , ता. १ : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाचा विद्यापीठस्तरीय “ कश्ती ” हा दोन दिवसीय मॅनेजमेंट युवा फेस्टिवल सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. यावर्षी “ नाविन्यता व उद्योजकता ” या विषयावरील विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. उद्घाटन कार्यक्रमात व्यासपीठावर प्रा. शरदचंद्र छापेकर, जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील, प्रा. जितेंद्र जमादार, प्रा.डॉ. विशाल राणा हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी प्रास्ताविकेत नमूद केले कि, जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या सुप्त कला गुंणांना वाव मिळण्याच्या दृष्टीकोनातून व नियमित शिक्षणासोबतच 360 डेव्हलपमेंट सहित कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल...