स्वायत्त जी. एच. रायसोनी महाविद्यालयात विविध विभागातील “टॉपर्स व पीअर टीचर" सन्मानित

३१ गोल्ड तर ३२ सिल्वर मेडल देत विध्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ; कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय सुराणा यांची प्रमुख उपस्थिती 

जळगाव, ता. ९ : स्वायत्त जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात ता. ९ गुरुवार रोजी अभियांत्रिकी व व्यवस्थापन विभागातील विविध अभ्यासक्रमातील प्रथम व द्वितीय आलेल्या विध्यार्थ्यांना गोल्ड व सिल्वर मेडल देवून सन्मानित करण्यात आले. तसेच “पीअर टीचर” म्हणजेच हा प्रोग्राम विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करण्यास मदत करते जसे महाविद्यालयात सध्याला शिकत असलेल्या विध्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात तसेच प्रॅक्टिकल ज्ञानात अधून मधून भर घालत मार्गदर्शन करणाऱ्या सिनिअर विध्यार्थ्यांना पीअर टीचर्स म्हणतात अशा विध्यार्थ्यांचा शोध घेत या कार्यक्रमात त्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला आर.सी.पटेल फार्मसीचे प्राचार्य व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्वोच्च मंडळ सिनेट वरील प्राचार्य डॉ. संजय सुराणा हे अध्यक्षस्थानी होते. तर विनले पॉलिमर्स प्रा. लीमिटेडचे संचालक प्रमोद संचेती व सिए दर्शन जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल,  अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत,  परीक्षा नियंत्रक अविनाश पांडे, रजिस्टार अरुण पाटील हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलन करुन करण्यात आले. या समारंभाच्या प्रास्ताविकेत रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, रायसोनी ग्रुप ऑफ इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांचे व्हिजन व महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच आज रायसोनी अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालय स्वायत्तया एक्सलन्स पातळीला गाठू शकले. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून दर्जेदार शिक्षणाची कास आम्ही कधीही सोडली नाही तसेच नवनवीन उद्योग विशिष्ट अभ्यासक्रम सुरु करण्यास आम्ही सतत प्रयत्नशील असल्याने आपल्या भागातील विध्यार्थ्यांना पुणे, मुंबईला जाण्याची गरज भासत नाहीए तसेच २०२०-२१ व २०२१-२२ या काळात बरेचेसे सर्टिफिकेट कोर्सेस आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील ऑर्गनायजेशन सोबत सुरु केले आहेत. डाटा सायन्स, ब्लॉक चैन टेक्नोलॉजी, बिजनेस अॅनलीटीक्स यासारख्या कोर्सेस आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीच्या ऑर्गनायजेशन सोबत सुरु केले आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हि आपली सर्वांची नैतिक जबाबदारी असून स्वायत्त जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात यावर्षापासूनच मेजर-मायनर प्रोग्राम, अॅकड्मिक बँक ऑफ क्रेडीट व मल्टी डिसीप्लिन अॅप्रोच आदीची सुरुवात झाल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० च्या दिशेने आमच्या महाविध्यालयाचे मार्गक्रमण सुरु झाल्याचे सांगत या धोरणामुळे शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन सर्वांचेच उत्तरदायीत्व वाढणार असून थोडक्यात तंत्रज्ञानाचा आधार घेत संशोधन आणि प्रयोगशिलतेद्वारे देशाला प्रगती पथावर नेण्याचे उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणाद्वारे साध्य केले जाणार आहे असे त्यांनी नमूद करत येत्या काळात समाजाच्या, उद्योगाच्या व इतरांच्या ज्या आमच्या रायसोनी इस्टीट्यूटकडून अपेक्षा आहेत त्या आम्ही निश्चितच पूर्ण करू असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर प्राचार्य डॉ. संजय सुराणा यांनी आपले मत व्यक्त करतांना म्हटले कि, नव्या पिढीतील तरुणांनी आपल्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांची जाणीव करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. येणारी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीचे अनुकरण करत असते. त्यामुळे तुमचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा, अशी कामगिरी तुम्हा तरुणांनी पुढील आयुष्यात करण्याची गरज आहे. आयुष्यातील ध्येय हे नेहमी मोठे असावे, त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम करून मिळवलेले यश हेच महत्त्वाचे असते,  आणि त्यामुळे आई-वडील व महाविद्यालयाचे नाव मोठे होते तसेच आता या वयातच फिटनेसची सवय लाऊन घ्या व आपले छंद झोपासा, रायसोनी महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त झाला असून नॅक ग्रेडनेही हे इस्टीट्यूट सन्मानित आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या भागातील विध्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यानंतर विनले पॉलिमर्स प्रा. लीमिटेडचे संचालक प्रमोद संचेती यांनी नमूद केले कि, आजचे शिक्षण आणि उद्योगांना लागणरी कौशल्ये यामध्ये मोठी तफावत आहे. यामुळे रोजगार उपलब्ध असतांनाही प्रत्यक्षात मिळत नाही आणि शिक्षण असूनही उमेदवार बेरोजगार राहतात. यासाठी आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन युवक-युवतींनी रोजगारक्षम व्हावे तसेच तंत्रज्ञानामुळे व कोरोनामुळे उद्योगात बदल झाले असे नाही तर ते कालचे उद्योग आजही त्याच स्थितीत आहे फक्त त्याच्या यशस्वी मार्गक्रमणाची पद्धत बदलेली आहे म्हणजेच आजच्या अपडेट तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात मोठ्याप्रमाणात बदल झाला आहे आणि आजच्या युवकांनी या बदलत्या प्रवाहासोबत जुडवून घ्यावे तसेच उद्योजकानी चांगल्या वेळेची वाट पाहत न बसता त्याच्यासाठी प्रत्येक वेळ ही काही सकारात्मकतेच्या सुरुवातीसाठी चांगली असते असे मत व्यक्त करत त्यांनी रायसोनी मंडी या उपक्रमाचे कौतुक करत या उपक्रमातून विध्यार्थी लर्निग बाय सेलिंगशिकतात आणि त्यांचा त्यांनी निश्चितच भविष्यात फायदा होतो असे सांगितले. यानंतर सिए दर्शन जैन यांनी नव्या पिढीतील तरुणांनी आपल्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांची जाणीव करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. येणारी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीचे अनुकरण करत असते. त्यामुळे तुमचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा, अशी कामगिरी तुम्हा तरुणांनी करण्याची गरज आहे. आयुष्यातील ध्येय हे नेहमी मोठे असावे, त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची तयारी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम करून मिळवलेले यश हेच महत्त्वाचे असते,  आणि त्यामुळे आई-वडील व महाविद्यालयाचे नाव मोठे होते असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातून मागील वर्षी प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना गोल्ड व सिल्वर मेडल देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रा. अंजली बियाणी यांनी केले तर पुरस्कृत विध्यार्थी व पिअर टीचर्स यांना व्यासपीठावर बोलावण्याची जबाबदार प्रा. रफिक शेख व प्रा. जितेंद्र जमादार यांनी पार पाडली तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तथा प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातून मागील वर्षी शिकून गेलेले गुणवंत पदवीधर विद्यार्थी, विद्यार्थीनी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


३१ विद्यार्थ्यांनी केली सुवर्ण पदकांची कमाई

एमसीए प्रथम वर्ष कांकरिया कशिष संजय, एमबीए प्रथम वर्ष जयस्वानी साक्षी राजेश, बीसीए प्रथम वर्ष अंशिका महेंद्र पाटील, बीसीए द्वितीय वर्ष कुशल भगवान पाटील, बीबीए प्रथम वर्ष सुदर्शन दिनेश जैन, बीबीए द्वितीय वर्ष सैनी सिमरनजीत कौर हरजीत सिंह, बीबीए द्वितीय वर्ष वालबानी सुरक्षा राजकुमार, यांत्रिक अभियांत्रिकी प्रथम वर्ष भावसार हर्षल विलास, बी.टेक मेकॅनिकल इंजिनीअरिंग द्वितीय वर्ष पाटील मयूर सुनील, बी.टेक मेकॅनिकल इंजिनीअरिंग 3रे वर्ष सय्यद जाव्वाद सय्यद आसिफ, बी. टेक. आयटी अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रदिप वसंत बारी, बीटेक आयटी अभियांत्रिकी द्वितीय वर्ष विशाल भारत रुंगथा, बीटेक आयटी अभियांत्रिकी तृतीय वर्ष अनुराग घूरन झा, बीटेक इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी प्रथम वर्ष चेतन विश्राम बारी, बीटेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग द्वितीय वर्ष दिनेश किशोर खैरनार, बी टेक ई अॅड टी सी अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रथमेश योगेश ठाकरे, बी टेक ई अॅड टी सी अभियांत्रिकी द्वितीय वर्ष आदेश सुधाकर म्हस्के, बी टेक ई अॅड टी सी अभियांत्रिकी 3रे वर्ष पवन मनोहर चव्हाण, बी टेक डेटा सायन्स इंजिनिअरिंग प्रथम वर्ष पुष्पराज रामकृष्ण साळुंखे, बीटेक डेटा सायन्स इंजिनिअरिंग द्वितीय वर्ष प्रियांका रवींद्र पवार, बी टेक डेटा सायन्स इंजिनीअरिंग तृतीय वर्ष गौरी दिनेश पाटील, बी टेक सीएसई अभियांत्रिकी प्रथम वर्ष श्रुतिका विजय पाटील, बी टेक सीएसई अभियांत्रिकी द्वितीय वर्ष  श्वेता राजेंद्र देशमुख, बी टेक सीएसई अभियांत्रिकी तृतीय वर्ष गिरिजा चंद्रकांत शिंगाडे, बी टेक सिव्हिल इंजिनिअरिंग प्रथम वर्ष प्रमोद चंद्रकांत भापसे, बी.टेक सिव्हिल इंजिनिअरिंग द्वितीय वर्ष सुचेता राजू बेलदार, बी टेक सिव्हिल अभियांत्रिकी तृतीय वर्ष घनश्याम मनोज कठपाल, बी टेक AIML अभियांत्रिकी प्रथम वर्ष देवश्री घनश्याम भक्कड, बी टेक एआय इंजिनिअरिंग प्रथम वर्ष देवेंद्र शिवकुमार पाटील, बी टेक एआय अभियांत्रिकी द्वितीय वर्ष मोहित किशोर साळुंके, बीटेक एआय इंजिनिअरिंग 3रे वर्ष "रोहित दिलीप अत्रे

 

या पिअर टीचर्सचा गौरव

बी टेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 4थे वर्ष दुर्गेश पाटील, बीटेक ई आणि टीसी अभियांत्रिकी तृतीय वर्ष सेजल पाटील, बीटेक सीएसई अभियांत्रिकी तृतीय वर्ष प्रज्ज्वल वाकुळकर, बीटेक एआय इंजिनिअरिंग 3रे वर्ष मोहित साळुंखे, बीटेक सिव्हिल अभियांत्रिकी तृतीय वर्ष शेख दानिश इम्रान, बी टेक डीएस अभियांत्रिकी तृतीय वर्ष प्रणय पाटील

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश