जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “भारतीय भाषा उत्सव” साजरा
यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार आयोजित उपक्रम ; ‘भारतीय भाषा संवर्धन’ या विषयावर संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे मार्गदर्शन
जळगाव, ता. २० : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील उच्च शिक्षण
संस्थांना ‘भारतीय भाषा उत्सव’ दरवर्षी साजरा करण्याचे निर्देश दिले
आहेत. त्यामुळे देशात पहिल्यांदाच भारतीय भाषा उत्सव उच्च शिक्षण संस्थांमध्ये
साजरा केला जात असून या निमित्ताने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग
अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातही हा दिवस मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने जर्मन, जापनीज फ्रेंच व इंग्लिश भाषा अभ्यास
विभागातर्फे वक्तृत्व स्पर्धा, स्वरचित
काव्यलेखन स्पर्धा, ‘भारतीय भाषा संवर्धनाचे उपाय’ या विषयावरील निबंधलेखन स्पर्धा अशा
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे मार्गदर्शक अध्यक्ष
म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आपल्या साहित्यलेखनाने भारतीय
भाषेची सेवा करणाऱ्या साहित्यिकांच्या कार्याचा गौरव करणारी चित्रफीत भारतीय
अभिमान गीताच्या पाश्र्वभूमीवर दाखविण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराती, तमिळ मल्याळम,
कानडी अशा भारतातील विविध भाषांमध्ये
सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत सर्वांना एकतेचा संदेश दिला. त्यानंतर संचालिका
प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले कि, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात
विद्यार्थ्यांनी भारतीय भाषांची एकात्मता शिकण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे
विद्यार्थ्यांमध्ये भाषा सौहार्द निर्माण करण्यासाठी पूरक वातावरण निर्मित झाले
आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना मातृभाषेसह जवळच्या दुसऱ्या भाषेविषयी आस्था
निर्माण होऊ शकेल. अन्य भारतीय भाषा शिकणे, बोलणे
हे आनंददायी झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना विविध प्रातांमध्ये बोलल्या जाणाऱ्या
भाषा, जाती-जमातींच्या भाषा, भारतीय प्रमुख भाषांतील काव्य, साहित्याविषयीची माहिती होणे आवश्यक
आहे. त्यामुळे भारताचे सांस्कृतिक ऐक्य, सांस्कृतिक
वारसा, विविधतेची माहिती विद्यार्थ्यांना होऊन
ते आयुष्यभर देशभरातील इतर प्रातांतील लोकांशी सहजपणे समरस होऊ शकतील या अनुषंगाने
भारतीय भाषा उत्सव हा विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरक ठरेल हे नक्की, तसेच सध्याची
जागतिक संधी ओळखत जी. एच. रायसोनी महाविध्यालयात विध्यार्थ्यांसाठी जर्मन, जापनीज व फ्रेंच या परदेशातील भाषा
शिकणे सक्तीचे केले आहे मुळात तंत्रज्ञानाने सर्वच गोष्टी सोप्या केल्याने सध्याला
सर्वच स्तरात लोकल टू ग्लोबल असा प्रवास सुरु झाला असून आपल्याला जर विकास साधायचा
असेल तर परदेशी भाषा शिकल्याने आपण आपले जीवन बर्याच मार्गांनी वाढवू शकतो. तसेच नातेसंबंध
आणि वैयक्तिक विकास यासारख्या गोष्टी सुधारण्यास भाषेमुळे मदत होते. असे मत
त्यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमात सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक
स्कूलच्या विध्यार्थ्यानी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. प्रा.
प्रिया टेकवानी यांनी विशेष योगदान देत या उपक्रमाचे समन्वय साधले तर या वेळी
महाविद्यालयातील प्रा. डॉ. सौरभ गुप्ता, प्रा.
बिपासा पात्रा, सायकॉलॉजिस्ट पूनम गेडाम, फ्रेंच ट्रेनर शरयू भुते, जर्मन ट्रेनर
बिपीन भिमते व जापनीज ट्रेनर रोहन रोकडे यासह प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी
उपस्थित होते. तसेच साक्षी पोहाणी व साहिल वर्मा या विध्यार्थ्यानी सूत्रसंचालन
केले. सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटच्या
संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी
अभिनंदन केले.
Comments
Post a Comment