जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये ‘संविधान दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा
संविधान उद्देशिकेचे भव्य सामुहिक वाचन ; विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग जळगाव , ता. ३० : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे ” भारतीय संविधान दिन ” साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सामूहिक उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले कि , संविधानाप्रती आपले प्रेम व बांधिलकी व्यक्त करण्याचा तसेच संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जागविण्याचा हा दिवस आहे. ‘ भारतीय संविधान हा आपल्याला आपल्या पूर्वजांकडून लाभलेला सर्वात मौल्यवान दागिना असून संविधानाच्या मातृरूपी छायेखाली सर्व भारतीयांचे जीवन सुकर झाले आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाप्रती आदर आणि निष्ठा ठेऊन वागले पाहिजे. घटनेतील तत्वाप्रमाणे वागलो तर निश्चितच देशाचा व्यवहार चोख होईल. राज्यघटना ही एक जिवंत दस्ताऐवज असल्याचे मत त्यांनी व्यक्त करत स...