उद्या सायंकाळी जी. एच. रायसोनी महाविद्यालयातर्फे “चाणक्य-फॉर कॉर्पोरेट लीडरशिप”वर व्याख्यान

प्रसिद्ध व्याख्याते डॉ. राधाकृष्णन पिल्लई हे करणार मार्गदर्शन ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांचे नागरिकांना उपस्थितीचे आवाहन

जळगाव, ता. २९ : येथील  जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालय व जी. एच. रायसोनी मेमोरियल टॉकमार्फत स्व. ग्यानचंद हिराचंद रायसोनी यांच्या जयंतीनिमित्त उद्या ता. ३० शुक्रवार रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय व्यवस्थापन विचारवंत डॉ. राधाकृष्णन पिल्लई हे उपस्थितांशी चाणक्य-फॉर कॉर्पोरेट लीडरशिपया विषयावर संवाद साधणार असून, शहरातील खानदेश सेंट्रल मॉल मधील आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये सायंकाळी ठीक ५.३० वाजता या व्याख्यानाला प्रारंभ होईल.

डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांची लेखक, संघटक आणि कॉर्पोरेट ट्रेनर अशीही ओळख असून, आत्मदर्शन आणि चाणक्य अन्विकीहे त्यांचे स्वलिखित पुस्तके वाचकप्रिय आहे. त्याबरोबरच त्यांच्या पुस्तकांनाही मोठी मागणी असून, नुकतेच त्यांचे ‘'द कॉरपोरेट चाणक्य'’ हे पुस्तक मराठीसह हिंदी व इंग्रजी भाषेत प्रकाशित झाले आहे. रायसोनी इस्टीट्युटतर्फे वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमांतर्गत हे व्याख्यान होणार असून, डॉ. राधाकृष्णन पिल्लई हे  त्यांच्या भटकंतीतील विविध अनुभव व चाणक्य-फॉर कॉर्पोरेट लीडरशिप” चे विविध मुद्दे ते व्याख्यानातून मांडणार आहेत. या व्याख्यानाचा सर्व शिक्षक,प्राध्यापक,अधिकारी,साहित्यिक,नागरिक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा,  असे आवाहन रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रायसोनी इस्टीट्युटचे कार्यकारी संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश