जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे एमएचटी-सीईटी परीक्षेत घवघवीत यश!

अभूतपूर्व कामगिरी ; संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व प्राचार्या सोनल तिवारी यासह सर्व स्तरातून विध्यार्थ्याचे कौतुक

जळगाव, ता. १४ : अभियांत्रिकी व मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या `एमएचटी- सीईटी` परीक्षेमध्ये येथील जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यामध्ये तेजस विजय बाविस्कर हा विद्यार्थी पीसीएम विभागात ९४.३८ पर्सेंटाईल मिळवून महाविद्यालयातून प्रथम आला असून दर्शन धनराज चव्हाण (९२.९१), चेतन बिपीन देलीवाला (८३.०४), वैभव वासुदेव नेहेते (८०.०७) पर्सेंटाईल गुणांसह यशस्वी झाले. तर महाविद्यालयाचे एकूण ५३ विद्यार्थी ७५ पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण मिळवणारे आहेत. या यशाबद्दल जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या कि, ''विद्यार्थी व पालक यांचा प्रचंड विश्वास हा महाविद्यालयाला नेहमीच बळ देण्याचे काम करत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे एमएचटी-सीईटी, जेईई, मेन / अॅडव्हान्स्ड, नीट मेडिकल या सर्वच परीक्षांमध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट निकाल लागला आहे. महाविद्यालयाचे अचूक नियोजन, योग्य मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे कष्ट आणि पालकांचा संस्थेवरील अतूट विश्वास ही चतुःसूत्री हे जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या यशाचे गमक आहे.दरम्यान, या परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रिती अग्रवाल यांच्याहस्ते झाला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. संदीप पाटील, प्रा. शितल किनगे, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. प्रियंका मल, प्रा. राहुल यादव, प्रा. मीनाक्षी पाटील, प्रा. नयना चौधरी , प्रा. निकिता वालेचा , प्रा. नेहा लुनिया , प्रा. शिवानी देशमुख, अनिल सोनार, संतोष मिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले. 

 

विध्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

तेजस विजय बाविस्कर म्हणाला की, महाविद्यालयातील चाचण्यांचे प्रकार, वेळेवर शंकानिवारण, अत्यंत मार्गदर्शनपर प्राध्यापकांचे प्रशिक्षण यामुळे मी हे यश साध्य केले आहे. माझ्या प्राध्यापकांच्या व पालकांच्या सतत प्रोत्साहन व पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले आहे.

 

दर्शन धनराज चव्हाण म्हणाला की, या निकालाने मी खूप आनंदी झालो असून आता जेईई ऍडव्हान्स २०२३ मध्ये उच्च क्रमांक मिळविण्याचे माझे उद्दिष्ट आहे. गेल्या काही दिवसात मी जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात असंख्य मॉक टेस्ट सोडवल्या, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. माझे पालक आणि प्राध्यापक यांचे मी विशेष आभार मानतो.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश