रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश
याही वर्षी विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी राखली महाविद्यालयाच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम
जळगाव, ता.२५ – नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला असून यात जी.एच.रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत याही वर्षी रायसोनीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. यात महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतून कशिश लक्ष्मण भागवानी हि विद्यार्थिनी ९१.५० टक्के मिळवून प्रथम तर श्रीपालचंद प्रकाशचंद जैन हा विद्यार्थी ९१.३३ टक्के मिळवून द्वितीय तसेच प्रियांशी महेशचंद्र जोशी हि विद्यार्थीनी ९०.३३ टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. तसेच विज्ञान शाखेतून निदा अमन शेख हि विद्यार्थीनी प्रथम आली असून त्यास ८४.८३ टक्के मिळाले आहे. तसेच नमन अजयकुमार गांधी हा विद्यार्थी ८३.०० टक्के मिळवून द्वितीय तर तन्मय अरुण जैन हा विद्यार्थी ८१.३३ टक्के मिळवून तृतीय आला आहे. यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना महविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी नमूद केले कि, महाविद्यालयातील तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा, नियमित वर्ग, नियमित सराव परीक्षा, विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील सातत्य तसेच परीक्षा काळातील प्रश्नांचा सराव घेतल्यामुळे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे सोपे झाले. याचेच फलीत म्हणून महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. तसेच येणाऱ्या अकरावी, बारावीच्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रायसोनी इन्स्टिट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद प्रा. संदीप पाटील, प्रा.प्रियांका मल, प्रा. शितल किनगे, प्रा. मीनाक्षी पाटील, प्रा. नयना चौधरी, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. निकिता वालेचा, प्रा. राहुल यादव, अनिल सोनार,संतोष मिसाळ यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment