जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ हर्षोल्हासात !

जळगाव, ता. १२ : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या सर्व विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच महाविध्यालयाच्या खुल्या सभागृहात पार पडला. यावेळी विध्यार्थ्यांसाठी विविध सांस्कुतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शूभेच्छा देण्यात आल्या. या सामूहीक कार्यक्रमाचे अध्यक्ष रायसोनी महाविद्यालयाचे उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा  हे होते. तर अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील, सिव्हील अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. शंतनू पवारआर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रमोद गोसावी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशनचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील,  प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडद्कर हे व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. प्रणव चरखा  यांनी नमूद केले कि, अभियंता सकारात्मक मार्गाने स्वतःची व समाजाची दिशा बदलवू शकतो. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी चांगला समाज घडविण्यासाठी वाटचाल करावी. जिद्द व चिकाटीने समाजाला पुढे घेऊन जावे, रोजगार निर्मिती करावी असे आवाहन त्यांनी केले. यानंतर अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी मार्गदर्शन केले कि, विध्यार्थ्यानो जर तुम्ही पूर्ण झोकून देऊन मेहनत केली तर तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, तूम्ही जे काही काम करत आहात त्यात प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. संकटांना न घाबरता मोठी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास घ्या.सतत कामात व्यस्त राहणारी माणसचं काहीतरी करुन दाखवितात. कोणत्याही कामाचा दर्जा ठेवा. दर्जेदार व प्रामाणिक, सचोटीने काम करा. यश तुम्हाला शोधत येईल. यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशनचे विभाग प्रमुख प्रा. तुषार पाटील यांनी आजच्या बदलत्या ओद्योगीक जगाचा आढावा घेत प्रत्येक व्यवसायात टेक्नोलॉजीला किती महत्व आले आहे यांचे विविध उदाहरणं देत स्पष्ट केले तसेच आजच्या प्रत्येक व्यवसायात जर ठीकून राहायचे असेल तर टेक्नोलॉजीशिवाय पर्याय नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी व समन्वयक म्हणून प्रा. वसीम पटेल, प्रा. योगेश वंजारी, प्रा. तुषार वाघ, प्रा. मनीष महाले, प्रा. पवन धोने, प्रा. शीतल जाधव, प्रा. शुभम घोष यांनी पार पाडली. यावेळी विविध विभागातील सहभागी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली तसेच यावेळी विध्यार्थ्यांसाठी सुरुची भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश