जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयाचा नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून नवीन अभ्यासक्रम तयार ; लवकरच होणार लागू

रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी घेतला आढावा ; “नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची दूरदृष्टी व त्याचे कृतीत रुपांतरया विषयावर जी. एच. रायसोनी महाविद्यालयात कार्यशाळा

जळगाव, ता. ६  : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची दूरदृष्टी व त्याचे कृतीत रुपांतरया विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महाविद्यालयातील प्राध्यापकांना मार्गदर्शन करतांना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सुरवातीला महाविद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडत नमूद केले कि, जागतिक स्तरावरील समस्या सोडवायच्या असतील तर आपण कात टाकली पाहिजे. त्यासाठी हे नवे शैक्षणिक धोरण मदत करेल. यावेळी या धोरणाला अनुसरून त्यांनी सांगितले कि सध्याला किती एक्सिस्टिंग क्रेडिट सिस्टम असून त्यात अजून कुठकुठल्या क्रेडीटसची वाढ आपले महाविध्यालय करीत आहे, तसेच इंजीनियरिंग व बिझनेस मॅनेजमेंट या शाखांमध्ये मेजर आणि मायनरया नवीन शैक्षणिक धोरणातील महत्वाच्या बाबीचा समावेश आपण करीत असून एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल.तसेच ओपन इलेक्टिव सब्जेक्ट, ऑन द जॉब ट्रेनीग, फिल्ड प्रोजेक्ट, समाजाभिमुख विविध कार्यक्रम, इंडियन नॉलेज सिस्टीम अंतर्गत येणाऱ्या संस्कृती व ज्ञान या विविध वैशिष्टपूर्ण विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करत रायसोनी महाविध्यालय विध्यार्थ्यांना दोन क्रेडीट देणार असल्याचे नियोजन आहे. तर या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी करताना आपल्या सिस्टीम मध्ये मेजर विषयांमध्ये ६४ क्रेडीट तर मायनर विषयामध्ये २० ते २४ क्रेडीट असणार आहे. म्हणजेच रायसोनी महाविद्यालय मल्टीडिसिप्लनरी अॅप्रोच इंट्रोड्यूस करीत असून, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला एकदा विध्यार्थी तो शिकत असलेल्या शाखेत मेजर ६४ क्रेडीट मिळवेल व त्याच्या शाखेव्यतिरिक्त त्याला इतर शाखेतील विषय शिकायची इच्छा असेल तर तो विध्यार्थी (उदा. विद्यार्थी मॅकेनिकल शाखेत शिकत आहे तर त्याचे मेजर ६४ क्रेडीट असतील आणि त्याला इतर विषयात जसे कि मॅकेनिकल शिकत असतानासुद्धा एमबीए विषयातील एखादा विषय, संगीत, साहित्य, नृत्य हे विविध विषय शिकून त्याचं मायनर २० ते २४ क्रेडिट प्राप्त करू शकणार आहे!) म्हणजेच कि, रायसोनी महाविध्यालयात २०२३-२४ पासून एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत आणि या मायनरविषयांसाठी रायसोनी महाविद्यालयात १५ पर्याय दिले जाणार आहेत. आणि तसेच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात आधीच १० विभाग असल्याने विध्यार्थ्यांना आता बहुआयामी शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांना त्यांच्या मुख्य शाखेच्या शिक्षणाचे प्रमाणपत्र तर मिळणारच आहे पण त्यासोबतच त्यांना त्यांनी आपल्या मुख्य अभ्यासक्रमाबरोबर शिकलेले इतर मायनर विषयातील शिक्षणाचे प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. या सोबतच जनरल ओपन इलेक्टीव्ह विषयामध्ये १४ ते १६ क्रेडीट महाविद्यालय देणार असून यात ओपन, ऑनलाईन, स्वयंम, एनपीटीएल चे कोर्सेस विध्यार्थ्यांना करता येणार आहे. व्होकेशनल आणि स्कीलचे १४ ते १६ क्रेडीट आहेत तर अॅबिलीटी एन्हांसमेंट्समध्ये महाविद्यालयातील अभ्यासक्रमात चार परदेशी भाषांचे पर्याय दिले जाणार आहे. यासोबतच इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये विध्यार्थ्यांना महाराष्ट्रातील किल्ले, भारतातील मुख्य नद्या, अजिंठा, एलोरा यासारख्या विविध लेण्याच्या अभ्यासासाठी २ क्रेडीट दिले जाणार आहे तसेच पर्यावरण, ह्यूमानिटी व सोशल प्रोजेक्टसला देखील इतर विषयासारखेच महत्व दिले जाणार असून इंटर्नशिप व लाइव्ह प्रोजेक्टस या को करिकुलर एक्टिविटीजला २८ ते ३० क्रेडीट रायसोनी महाविद्यालयाच्या नियोजित आराखड्यात अंतर्भूत केले आहे. तसेच रायसोनी इस्टीट्युटने भारतातील नावाजलेली इंडियन इंस्टीट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, नागपूर या सारख्या विविध संस्थांशी करार केला असून क्रेडीट ट्रान्सफर स्कीम या योजनेत ज्या विध्यार्थ्याला ९ सीजीपीए पेक्षा जास्त मार्क आहे तेच पात्र विध्यार्थी नागपूरच्या आयआयआयटी या इस्टीट्युटमध्ये जाऊन एक सेमिस्टर पूर्ण करू शकतील व तेथील त्या सेमिस्टरचे क्रेडीट ट्रान्सफर आपल्या महाविध्यालयात होईल. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाने एबीसी पोर्टलला नोंदणी केली असल्याने येथील विध्यार्थ्यांना मल्टिपल एन्ट्री आणि मल्टिपल एक्झीटची सुविधा उपलब्ध असणार आहे या अनुषगाने प्रथम वर्ष नंतरच्या ज्या विध्यार्थ्यांना एक्झीट घ्यावयाची असेल त्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र, द्वितीय वर्षानंतर डिप्लोमा, तृतीय वर्षानंतर डिग्री व अंतिम वर्षानंतर विद्यार्थ्यांना ओनर्स किंवा रिसर्च मिळणार आहे. या पद्धतीने रायसोनी महाविध्यालयात चार वर्षाचा अभ्यासक्रम राबविण्यात येत असून २०२३-२४ पासून एमबीए, बीबीए, एमसीए व बीसीए अभ्यासक्रमासाठी देखील या पद्धतीची अंमलबजावणी लागू करण्यात येणार आहे. या पद्धतीमुळे विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नसल्याने हे धोरण विध्यार्थ्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व व अंगभूत गुणांचा विकास हा समतोल राखण्याची अपेक्षा धोरणात व्यक्त करण्यात आली असल्याने याची सर्वांग अंमलबजावणी रायसोनी महाविद्यालयात केली जाणार आहे. वक्तृत्व, संगीत, साहित्य, कला, टीम वर्क, नेतृत्व, संशोधन, प्रयोग, उद्योजकता, समाजसेवा, नैतिकता, साहस, राष्ट्रप्रेम, परोपकार, मानवता, खेळ, चारित्र्य अश्या विविध पैलूंची ओळख व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जावे, या विविध बाबीवर फोकस करण्यात आले आहे. याचबरोबर विद्यार्थाला नेमून दिलेल्या ठराविक अभ्यासक्रम देखील पूर्ण करावा लागणार आहे. परीक्षेत केवळ उत्तम गुण मिळवणे यापेक्षा त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालय जास्त भर देणार आहे असे रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश