जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात तंबाखू विरोधी दिन साजरा

तज्ञ डॉक्टरांनी केले मार्गदर्शन तसेच पथनाट्यातून जनजागृती ; विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग जळगाव , ता. ३१ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात १०६.४ एफएम रेडीओ ऑरेंज जळगाव , इस्टीट्युट इनोव्हेशन कॉन्सील विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंचम हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ञ डॉ. अतुल भारंबे , डॉ. प्रशांत चोपडा व दंत शल्यचिकित्सक डॉ. पूजा भारंबे उपस्थित होत्या. त्यांनी तंबाखूमध्ये आढळणारं कार्बन मोनोऑक्साइड आणि निकोटीन हे तुमच्या तोंडासाठी अनेक प्रकारे नुकसानदायक ठरू शकते. तंबाखूच्या सेवनाने दातांवर डाग पडणे , तोंडाला दुर्गंधी येणे , दात पिवळे पडणे असे दुष्परिणाम होतात. याशिवाय तंबाखूचा वारंवार उपयोग केल्याने गळा , तोंड आणि एसोफंगल कॅन्सर होण्याचा धोकाही जास्त असतो. असे सांगत त्यांनी तंबाखू सेवनाचे विविध दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक...