जी. एच. रायसोनी महाविद्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
जळगाव, ता. ११ : जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट
ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा
फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम अॅडमिनिस्ट्रेशन डीन
प्रा. डॉ. संजय शेखावत व रजीस्टार अरुण पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले
यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले, या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ.
प्रणव चरखा होते. या प्रसंगी बोलताना प्रा. डॉ. चरखा म्हणाले की, अविद्येच्या अंधकारात आपले अस्तित्व
हरविलेल्या जनसामान्यांना विद्येच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारे महात्मा फुले हेच
सामाजिक क्रांतीचे अग्रदूत आहेत. तसेच स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते, समाज सुधारक, समाज प्रबोधक, विचारक, समाजसेवक, लेखक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा
फुले यांचे विचार समाजातील वंचित, शूद्र, मागास या सर्व स्तरातील लोकांसाठी
मुक्तीपथ म्हणून कार्य करणारे आहेत. त्यांच्या जयंतीदिनी मी त्यांना विनम्र
अभिवादन करतो.या कार्यक्रमाला प्रकाश शर्मा, अजय
चौधरी, बापूसाहेब पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शीतल जैन, अनिकेत विसपुते, बिमलेन्द्रू पात्रा, दिनेश अहिरराव, प्रा. स्वाती बाविस्कर, पूजा बोरसे, ज्ञानेश्वर येवले, महेंद्र
ढोणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी
इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले
Comments
Post a Comment