विद्यार्थ्यांनी उद्योजकतेची कास धरावी - प्रसाद कोकिळ
जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविध्यालयात कार्यशाळा ; विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थित
जळगाव, ता. २८ : ‘कुठल्याही क्षेत्रात यश मिळविताना मेहनत, नाविन्यपूर्ण गोष्टींचा अधिकाधिक वापर आवश्यक आहे. प्रयोगशीलता हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. प्रयोगशीलतेशिवाय नवनिर्मिती अशक्य आहे,’ असे प्रतिपादन मराठवाडा अॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल म्हणजेच मॅजिकचे संस्थापक संचालक प्रसाद कोकिळ यांनी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्यावतीने आयोजित “मॅजिक हेड – सोल्वींग रिअल वर्ड प्रॉब्लेम” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत व्यक्त केले. याप्रसंगी जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाचे उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. “मॅजिक हेड – सोल्वींग रिअल वर्ड प्रॉब्लेम” या विषयावर मार्गदर्शन करताना कोकिळ पुढे म्हणाले कि, स्वतःचा स्टार्ट अप व्यवसाय सुरु करताना व्यवसायासाठी गुंतवणूक कशी करावी, व्यावसायिकतेच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतत बदल कसा करावा , ग्राहकांच्या मागणीनुसार व्यवसायाच्या सादरीकरणात बदल करणे, व्यवसायाची जिद्द कायम असायला हवी, व्यवसायाचा विचार करताना भांडवलाचा विचार, विविध परवान्यांची पूर्तता, मनुष्यबळाची गरज, व्यवसायाच्या वाढीचा विचार, मार्केटींग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करीत उद्योजकतेचा मार्ग निवडलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांसाठी मराठवाडा अॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल मार्गदर्शन करण्यासाठी कटिबद्ध आहे. असे सांगितले तसेच ‘आपल्याकडे इनोव्हेशन हा शब्द अगदी सहजपणे वापरला जातो, पण त्यामागे अथक परिश्रम असतात. हे लक्षात घेतले पाहिजे. पॉलिस्टरने कपड्याच्या क्षेत्रात क्रांती घडविली. भारतीयांकडे प्रचंड पात्रता असूनही आपण इनोव्हेशनकडे लक्ष देत नाही. ‘इन्व्हेन्शन’ आणि ‘इनोव्हेशन’ या दोघांमध्ये अनेकवेळा गल्लत होते. वास्तविक दोन्हींमध्ये मोठा फरक आहे. इनोव्हेशन हे उद्योगांसाठी ऑक्सिजन बनले आहे. आज तुम्ही स्वतःला अपडेट केले नाही, तर तुम्ही संपाल. ‘इनोव्हेशन’ ही उद्योगातील प्रक्रिया आहे. विक्री, विपणन, उत्पादन हे त्याचे काही भाग आहेत. जागतिक पातळीवरील स्पर्धेमुळे घरेलू मार्केटमधील उद्योगांनाही आता स्वतःला बदलून घेणे आवश्यक बनले आहे. इनोव्हेशन करताना त्यात चुका होणे क्रमप्राप्त आहे. कारण प्रयोगशीलतेतून तुम्ही केलेल्या प्रयोगात काही लगेचच यश मिळणार नाही. अपयश पचविण्याची आपली मानसिकता नाही. सोपे असलेले स्वीकारून त्यातच पुढे संशोधनाचा ट्रेंड आहे. आपण ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले. किमती कमी झाल्या पण त्यात नाविन्यपूर्णता पुढे सुरू ठेवणे क्रमप्राप्त आहे. ऑडिओ कॅसेट आज काळाचा ओघात लुप्त झाल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानाने जुने तंत्रज्ञान मोडित निघाले, भविष्यात याचा विचार करून इनोव्हेशनवर आपण भर दिला पाहिजे,’ असा सल्ला त्यांनी दिला. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती जाखेटे यांनी केले तर प्रा.कौस्तव मुखर्जी, प्रा. प्रमोद गोसावी, प्रा. तुषार वाघ व आदींनी या कार्यक्रमाला सहकार्य केले. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

Comments
Post a Comment