जी. एच. रायसोनी महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

जळगाव, ता. १४: जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम ॲडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा होते. या प्रसंगी बोलताना प्रा. डॉ. चरखा म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाश्वत विकासासाठी संकल्पना मांडून त्या कृतीत आणत देशाला भक्कम करण्याचा प्रयत्न केला, असे सांगताना डॉ. बाबासाहेबांचे कार्य युवा पिढीसाठी मार्गदर्शक असून, शिक्षणांसंदर्भातील त्यांचे विचार वास्तविक आणि युवा पिढीला प्रेरणादायी ठरणारे असून, युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र अभ्यासावे, असे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमाला प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश