जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयाने एकाच दिवशी नोंदविले २० पेटंट व २५ कॉपीराईट
.jpeg)
जागतिक बौद्धिक संपदा दिनाच्या ओचीत्त्याने विद्यार्थी , प्राध्यापकांची कामगिरी ; विविध स्तरातून कौतुकांचा वर्षाव जळगाव , ता. २९ : मानवी बुद्धीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संपत्तीचे रक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २६ एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिन सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने जळगाव शहरातील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात पेटंट व कॉपीराइट्स संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण २० पेटंट व २५ कॉपीराइट्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी दाखल केले. इस्टीट्युटच्या इंडस्ट्री प्रॅक्टीसेस , अॅकडमिक , शैक्षणिक साहित्य तसेच इंडस्ट्रीमध्ये कुठकुठल्या बेस्ट प्रॅक्टीसेस आहेत यासह स्टुडंट्स प्रोजेक्टवरील पोस्टर , लॅब मॅन्युअल , कोर्स नोट्स , पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन , मोनोग्राफ आदी बाबींवर हे कॉपीराइट दाखल करण्यात आले आहेत. यावेळी मार्गदर्शन करतांना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी ' मानवाद्वारे साकारण्यात येणारे कोणत्याही स्वरूपाचे रचनात्मक कार्य म्हणजे बौद्धिक ...