शेगांव येथील राष्ट्रीय परिषदेतील शोधनिबंध स्पर्धेत “जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यां”चे घवघवीत यश
“हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम”ची शोध निबंधात अभ्यासपूर्ण माहिती ; संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यासह सर्व स्तरातून विध्यार्थ्यांचे कौतुक
जळगाव, ता. २० : शहरातील जी. एच. रायसोनी
इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स
अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी शेगांव येथे आयोजित राष्ट्रीय
परिषदेतील शोधनिबंध स्पर्धेत जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यानी यश
मिळविल्याबद्दल त्यांचा रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी,संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ.
प्रणव चरखा व अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत
यांनी सत्कार केला. माऊली अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगांव यांच्यावतीने राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धा घेण्यात आली होती.
यात भारतातून अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये रायसोनी महाविदयालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स
अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील अंतिम वर्षाच्या पल्लवी सुर्वे, वैष्णवी कासार व
समृद्धी सोनार या विध्यार्थिनीणी “हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम्स युजिंग - IOT” याविषयी सादर केलेल्या प्रबंधाला द्वितीय
पुरस्कार मिळाला. यावेळी प्रबंधाचे परीक्षकांनी मोठ्या उत्साहाने कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून सहभागी
विध्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार
पाटील व प्रा. डॉ. मयूर जाखेटे यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment