विध्यार्थ्यांनों धाडसाने भाषण करायला शिका व नेतृत्व कौशल्य आत्मसात करा : प्रा. डॉ. प्रणव चरखा
जी. एच. रायसोनी महाविध्यालयात “लेट्स टॉक” (चला बोलूया) या अॅक्टीव्हीटी क्लबचे उदघाटन
जळगाव,ता.१७ : असं म्हणतात कि, “कवी हा जन्मावाच लागतो, तो घडवता येत नाही, पण वक्ता मात्र घडवता येऊ शकतो”. चिंतन, मनन, वाचन, श्रवण, निरीक्षण याच्या बळावर वक्तृत्व कला आत्मसात करता येऊ शकते. जो जिभेला जिंकेल तो जग जिंकेल असे म्हणतात ते काही खोटे नाही. भाषण कला हि हजारो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. सुविचार, उच्चार, आचार, प्रचार हे प्रभावी वक्ता होण्यासाठी आधारस्तंभ आहेत, त्यामुळेच तर वक्त्यांची ख्याती सर्वदूर पोहोचत असते. वक्त्याला त्याच्या चेहऱ्यावरून नाही तर त्याच्या विचारावरून, आवाजावरून, आणि बोलण्याच्या कौशल्यावरूनच ओळखले जाते. विध्यार्थी असो कि शिक्षक असो, आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा भाषण हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे मित्रांनो धाडसाने भाषण करायला शिका व नेतृत्व कौशल्य आत्मसात करा असे मत रायसोनी इस्टीट्युटचे उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी नुकतेच जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयातील विद्यार्थ्यांसाठी “लेट्स टॉक” (चला बोलूया) या अॅक्टीव्हीटी क्लबच्या उदघाटनाप्रसंगी व्यक्त केले. या अॅक्टीव्हीटी क्लबच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या मनातील बोलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमाची मूळ संकल्पना कार्निगी सर्टीफाईड ट्रेनर प्रा. राहुल त्रिवेदी यांची आहे.विद्यार्थ्यांमधील अनेक उणीवा लक्षात घेऊन त्यांचा नेतृत्व विकास, संवाद कौशल्य, मनातील भिती, व्यक्त होण्याचा सराव या सर्व बाबींचा विकास करण्याच्या उद्देशाने या क्लबची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी कोणताही विषय घेऊन विद्यार्थ्याला बोलता येणार आहे. त्याला विषयाचे बंधन नाही. विद्यार्थीच विद्यार्थ्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या त्यांची जगण्याची पद्धत, आपली जबादारी, कर्तव्य लक्षात घेऊन बदल करण्याचा प्रयत्न हे विविध मुद्धे हाताळणार आहेत. या उद्घाटन कार्यक्रमात अविनाश जोशी व काजल जोशी या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांमध्ये व्यक्त होताना भिती निर्माण होत नाही. आम्ही सहजपणे आमचे विचार मांडू शकतो. तसेच एखादा विद्यार्थी अभ्यासात हुशार असतो. एखादा इतर कलागुणांमध्ये विकसित झालेला असतो. त्यामुळे शिक्षक देखील त्यांच्यात बौद्धिक तुलना करतात. परंतु ज्याच्या अंगी जे गुण विकसित आहेत त्यांचाच अधिक विकास करून आपल्या आवडीच्या क्षेत्रात विकसित होता येईल असे देखील या विध्यार्थ्यानी क्लबच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी “लेट्स टॉक” (चला बोलूया) या अॅक्टीव्हीटी क्लबच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्यात.
Comments
Post a Comment