यशस्वी भविष्यासाठी मोठी स्वप्न बघा आणि ती सत्यात उतरवण्यासाठी योग्य मार्गाने मेहनत करा : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात अभियांत्रिकी प्रथम वर्षविद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा संपन्न


जळगाव, ता. १७ कोणतही यश सहजाजसहजी मिळत नाही. यशाला शॉर्टकट नसतो तर जिद्द मेहनत अन् अभ्यासात सातत्य असेल, तर निश्चित यश मिळतेच तसेच जिद्द, चिकाटी, परिश्रम व जबाबदारी हे गुण अंगी असल्यास विदयार्थ्यांना यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. तसेच भविष्यात समाजाच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. असा यशाचा कानमंत्र देत त्यांनी यावेळी महाविध्यालयाच्या विविध उपक्रमाची व म्युझिक क्लब, डान्स क्लब, लेट्स टोक क्लब, टोस्ट मास्टर क्लब या विविध हॉबी क्लबची माहिती देत या क्लब मध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले. व या विविध क्लबमुळे विध्यार्थ्यामध्ये संवाद कौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्व गुण, टीमवर्क स्किल हे सारे कौशल्य आत्मसात होण्यास मदत हौवून  ही यशस्वी करिअरची एक उत्तम सुरवात आहे. चांगल्या बॉडी लँग्वेजने तुम्ही तुमचे करिअर उच्च स्तरावर नेऊ शकता व आजच्या काळात असे सर्वगुण संपन्नच युवकांची इंडस्ट्रीला गरज असल्याचे त्यांनी सांगितले व  विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इस्टीट्युट सदैव कार्यतत्पर असते असे रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या सर्व विभागाच्या प्रारंभया शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभ कार्यक्रमावेळी व्यक्त केले. याप्रसंगी रायसोनी इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, अभियांत्रिकी प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडद्कर व कार्निगी सर्टीफाईड ट्रेनर प्रा. राहुल त्रिवेदी हे व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात संचालिका प्रा. डॉ. अग्रवाल पुढे म्हणाल्या की, उद्योग ४.० व एज्युकेशन ४.० ही चौथी ओद्योगिक क्रांती आहे जी बऱ्याच समकालीन ऑटोमेशन, डेटा एक्सचेंज आणि मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाचा समावेश करते या क्रांतीसोबत आजच्या युवकांनी जुळायला पाहिजे तसेच जागतिक स्तरावरील बदलत्या घडामोडींचे आकलन करून संगणक, व्यवस्थापन व इतर पूरक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यावर भर द्यावा व या बदलत्या परिस्थितीत करिअरचे नियोजन कसे करावे यांचे अनेक उदाहरणांसहित त्यांनी मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमात नुकताच प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन तसेच त्यांच्यासाठी सांस्कुतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचे स्वागत करण्यात आले व यावेळी विद्यार्थ्यांना प्राध्यापक वर्ग व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची माहिती देत  महाविद्यालयातील मुबलक सुविधा, हॉबी क्लब, बस, लायब्ररी, मैदान, ग्रंथालय, जिम याबद्दलचीहि माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी व समन्वयक म्हणून प्रा. प्रिया टेकवानी, सिव्हील विभागप्रमुख शंतनू पवार, मॅकेनिकल विभागप्रमुख मुकुंद पाटील, कॉम्प्यूटर विभागप्रमुख सोनल पाटील, इलेक्ट्रीकल विभागप्रमुख तुषार पाटील, इलेक्ट्रोनिक विभागप्रमुख बिपासा पात्रा व प्रा. स्वाती बाविस्कर यांनी पार पाडली. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश