प्राध्यापकांनी आपल्या नियमित अध्यापनाबरोबरच संवाद व व्यवस्थापन कौशल्य समृद्ध करणे गरजेचे : ट्रेनर प्रा. राहुल त्रिवेदी

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी फँसिलीटेशन व कम्युनिकेशन स्किल्सया विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा


फोटो ओळ : रायसोनी महाविध्यालयातील कार्यशाळेप्रसंगी मार्गदर्शन करतांना डेल कार्निगी सर्टीफाईड ट्रेनर प्रा. राहुल त्रिवेदी

जळगाव, ता. १ : येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करताना महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण कसे देता येईल याचाच प्रामुख्याने विचार केला आहे. याच उपक्रमांतर्गत रायसोनी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून त्याच उपक्रमांतर्गत कार्निगी सर्टीफाईड ट्रेनर प्रा. राहुल त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापकांसाठी फँसिलीटेशन व कम्युनिकेशन स्किल्सया विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमीक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा व आदींची उपस्थिती होती फँसिलीटेशन व कम्युनिकेशन स्किल्स  यांचे अध्यापनात उपाययोजना  या विषयावर विशेष सत्र घेण्यात आले. या कार्यशाळेत कॅम्पस ट्रेनर प्रा. राहुल त्रिवेदी म्हणाले कि,  यशात निरोगी मनोवृत्तीचा वाटा ८५ टक्के असून प्रेरणा-प्रवृत्तीचा माणसावर फार मोठा प्रभाव असतो. व्यक्ती घडली तरच घर, समाज, संस्था, देश, जग घडेल यावर सर्वच विचारवंतांचे एकमत आहे. राज्यातील तरुण-तरुणींना उत्कृष्ट कार्य करण्यास प्रवृत्त करणे असा रायसोनी इस्टीट्युटचा मानस असल्याचं सांगत त्यांनी सेल्फ मोटिव्हेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, बिझनेस एटिकेट्स, अँगर मॅनेजमेंट, कम्युनिकेशन स्किल्स, प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिकेशन, बॉडी लँग्वेज, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, डिसिजन मेकिंग, सेल्फ अवेअरनेस व आदीबाबत प्रात्यक्षिकासह यावेळी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश