जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विध्यार्थ्यानी जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांकाची बक्षिसे जिंकली

जळगाव, ता. ८ : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलची विध्यार्थिनी स्वरा वाघ, ऋतुजा भंडारी व खुश हसवाणी या विद्यार्थ्यानी एकलव्य क्रीडा संकुल आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमाकाचे यश संपादन केले असून १०० मी. फ्री स्टाईल प्रकारात सुवर्ण पदक, ब्रेस्टस्ट्रोक या प्रकारातही सुवर्ण पदक तर ५० मी. फ्री स्टाईल या प्रकारात रोप्य पदक मिळवत स्वरा मुकेश वाघ या विध्यार्थिनीने जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच ऋतुजा हर्शल भंडारी या विध्यार्थिनीने रिले प्रकारात सुवर्ण तर ५० मी. फ्री स्टाईल या प्रकारात कास्य पदक पटकावले यासह खुश विक्रम हसवाणी या विद्यार्थ्याने देखील बँकस्ट्रोक या प्रकारात कास्य पदक पठकावले आहे. यावेळी या स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या १९ विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत विजयी ठरलेल्या विध्यार्थ्यांचे जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी अभिनंदन केले तर क्रीडाशिक्षक संजय चव्हाण तसेच जलतरण प्रशिक्षक वैभव सोनावणे व जागृती परदेशी यांचे या सर्व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश