जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “ग्रीन कलर डे” साजरा
जळगाव ता. २ : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल
मध्ये “ग्रीन कलर डे” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रायसोनी पब्लिक स्कूलच्या
पहिली ते आठवी तसेच प्ले ग्रुप ते सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने
या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व शिक्षिक हिरव्या
रंगाचे कपडे परिधान करून आले होते, हिरव्या रंगाच्या
पोशाखात स्कूल मध्ये दाखल झालेली सर्व लहान मुलं सगळ्यांच्या मनाला समोहित करत
होती. यावेळी विद्यार्थ्यांना हिरव्या रंगाची ओळख व्हावी या अनुषंगाने “ग्रीन कलर डे” चे औचित्य साधून
पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन द्वारे विध्यार्थ्यांना हिरव्या रंगाची माहिती देण्यात आली
तसेच हिरव्या रंगांचे विविध वस्तूं टेबलावर मांडण्यात आल्या व मयुरी वालेचा, नेहा
चिंचोले, व रिंकू
लुल्ला या शिक्षकांनी या वस्तूंचा आधार घेत विद्यार्थ्यांना हिरव्या रंगाची माहिती
सांगितली तसेच हिरव्या रंगाचे विविध मनोरंजक गोष्टी सांगितल्या. यानंतर
विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या
मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी वैज्ञानिक युगात हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक कसे
आहे हे मुलांना स्पष्ट केले तसेच हिरव्या रंगाद्वारे सर्व सुरळीत असल्याची माहिती
कशी दिली जाते, रस्त्यावरील अपघात
टाळण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर कसा केला जातो हेही त्यांनी आपला मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना
समजावून सांगितले. या कार्यक्रमासाठी तस्नीम टकंरवाला, नेहा चिंचोले, , आरती पाटील, निधी खडके, सोनिया शर्मा, नेहा शिंपी, दिपाली कुलकर्णी यांनी
सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी पब्लिक
स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांनी अभिनंदन केले.
Wow teachers r carrying umbrella n small children r sitting in hot sun
ReplyDelete