जी. एच. रायसोनी वंडर किड्सच्या चिमुकल्यांनी साकारल्या शाडू मातीच्या आकर्षक गणेशमूर्ती
जळगाव, ता. ३० : चिमुकल्या हातांनी आपली कलात्मकता दाखवित मातीच्या गोळ्यातून अतिशय सुबक आणि देखणी गणेशाची मूर्ती विद्यार्थ्यांनी तयार केली. सुपासारखे कान…लांबलचक सोंड…गोलाकार पोट…पीतांबर…मोत्यांची माळ…डोक्यावर आकर्षक मुकूट तयार करीत शाडू मातीची पर्यावरणपूरक मूर्ती एकाचवेळी अनेक विद्यार्थ्यांनी साकारल्या.
शहरातील गणपती नगर येथील जी. एच. रायसोनी वंडर
किड्समध्ये पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित
करण्यात आली होती. यावेळी नेहा चिंचोले, मयुरी
वालेचा, आरती पाटील, निधी खडके, रिंकू लुल्ला, सोनिया शर्मा, नेहा शिंपी, दिपाली कुलकर्णी या शिक्षकांनी येथील
नर्सरी व प्ले ग्रुपच्या विद्यार्थ्यांना शाडू मातीच्या आकर्षक गणेशमूर्ती
बनविण्याचे प्रशिक्षण दिले.
गणेशोत्सवात बाजारातून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या
मूर्ती खरेदी केल्या जातात. त्या मूर्तींचे विसर्जन केल्यामुळे पाण्याचे प्रदूषण
होते. या बाबीचा मागोवा घेत मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या संकल्पनेतून “प्रदूषणमुक्त गणेशोत्सव” या शीर्षकाखाली हि कार्यशाळा घेण्यात
आली तसेच विद्यार्थ्यामध्ये जनजागृती देखील करण्यात आली. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन
केल्याबद्धल रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांनी अभिनंदन
केले.

Comments
Post a Comment