जी. एच. रायसोनी महाविद्यालयात जल्लोषात रंगली तरुणाईची दहीहंडी

 

जळगावता. २० –   रंगीबेरंगी पोषाखात नटलेले राधा-कृष्णाच्या वेशातील विध्यार्थी … विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडी… विविध गाण्यांचा गजर…. हंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोष… अशा उत्साही वातावरणात रायसोनी महाविद्यालयाच्या संगणक विभाग व विध्यार्थी कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दहीहंडीचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी दहीहंडी फोडणे, नृत्यगायन व रॅप असे मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून गोकुळाष्टमी जल्लोषात साजरी केली. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी दहीहंडीचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. विध्यार्थ्याशी संवाद साधताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी प्रतिपादन केले कीआपण सर्व विध्यार्थ्यानी समाजात सामाजिक सलोखा जपून त्याद्वारे बंधुता व एकता जोपासणे खूप गरजेचे आहे तसेच युवकांमधील साहस वाढविणेएकीचे महत्व पटवून देणे यासाठी दहीहंडीचा उपक्रम राबविण्यात आला असे त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमात श्रीकृष्णाच्या वेशभूषेत महेक वालेचा आणि राधेच्या वेशभूषेत लक्ष्मी मंधान व गोपिकेच्या भूमिकेमध्ये लक्ष्मी शेलारभाविका रेवतानीपवन चव्हाण, हितेश मोरे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कल्याणी नेवे यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन प्रा. विनोद महाजनप्रा. मयुरी गचकेप्रा.श्रिया कोगटा, प्रा.सरिता चरखा, प्रा. रुपाली ढाके, प्रा करिष्मा चौधरी, प्रा.वसिम पटेल यांनी केले तर आभार प्रा. रफिक शेख यांनी मानले तसेच दहीहंडी उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश