जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये नाट्य स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगाव, ता. १७ : येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल मध्ये हेलनओग्रेडी इंटर नॅशनल ऑर्गेनाइजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच “इंटर हाउस नाट्य स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये “सोशल मिडियाचे दुष्परिणाम” या विषयावर पहिली ते आठवीच्या ८३ विद्यार्थ्यांनी चार लघुनाटिका सादर केल्यात. त्यात विध्यार्थ्यानी सोशल मिडिया वापराचे आधी व नंतरचे जीवन त्याचे फायदे व तोटे, सोशल मिडिया जसा युज कराल तसा परिणाम भोगाल तसेच सोशल मिडियामुळे तरुणाईची वाढती फसवणूक यासह विविध विषयावर सहभागी विध्यार्थ्यानी नाट्यछटा सादर करत आपल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेचे उद्घाटन रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्याहस्ते करण्यात आले त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नमूद केले की, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातून नाट्य कलावंत निर्माण व्हावेत, नाटक करताना विद्यार्थ्यांमध्ये मनोरंजनाबरोबरच जीवनाकडे बघण्याची एक सकारात्मक दृष्टी निर्माण व्हावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते असे त्यांनी यावेळी सांगितले. या नाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून शहरातील ज्येष्ठ नाट्यकर्मी श्री सुबोध सराफ व ममता शरण यांनी काम पाहिले. तसेच या नाट्यस्पर्धेसाठी प्रशांत महाशब्दे, अमन पांडे, लीना त्रीपाटी, तस्लिम रंगरेज, सविता तायडे, तुषार कुमावत, विजया लोंढे, शुभांगी बडगुजर यांनी सहकार्य केले. सदर स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment