Posts

Showing posts from August, 2022

जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग अ‍ॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात 'श्री गणेशाचे' जल्लोषात स्वागत

Image
जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील गणेशोत्सवात श्री गणेशाची पूजा करताना  रायसोनी इस्टीट्युटचे  संचालक  श्री. प्रितम जी  रायसोनी व जल्लोष करतांना विध्यार्थी जळगाव , ता. ३१ : येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालय व जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालय वर्षभर विध्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी विविध उपक्रम राबवीत असते. या अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणरायाची स्थापना रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितम जी रायसोनी यांच्या हस्ते जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात करण्यात आली. पाचशेहून अधिक विध्यार्थ्यानी मिरवणुकीत सहभागी होत ढोलताशांच्या गजरात श्री गणेशाचे स्वागत केले. ‘ गणपती बाप्पा मोरया ’ च्या जयघोषात गणपतीची स्थापना करण्यात आली. दहा दिवस विविध स्पर्धांचे आयोजन महाविध्यालयात केले जाणार आहे. ढोलताशाच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढून विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. याप्रसंगी बिजनेस मँनेजमेंटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रव...

जी. एच. रायसोनी वंडर किड्सच्या चिमुकल्यांनी साकारल्या शाडू मातीच्या आकर्षक गणेशमूर्ती

Image
जळगाव , ता. ३० : चिमुकल्या हातांनी आपली कलात्मकता दाखवित मातीच्या गोळ्यातून अतिशय सुबक आणि देखणी गणेशाची मूर्ती विद्यार्थ्यांनी तयार केली. सुपासारखे कान … लांबलचक सोंड … गोलाकार पोट … पीतांबर … मोत्यांची माळ … डोक्यावर आकर्षक मुकूट तयार करीत शाडू मातीची पर्यावरणपूरक मूर्ती एकाचवेळी अनेक विद्यार्थ्यांनी साकारल्या. शहरातील गणपती नगर येथील जी. एच. रायसोनी वंडर किड्समध्ये पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नेहा चिंचोले , मयुरी वालेचा , आरती पाटील , निधी खडके , रिंकू लुल्ला , सोनिया शर्मा , नेहा शिंपी , दिपाली कुलकर्णी या शिक्षकांनी येथील नर्सरी व प्ले ग्रुपच्या विद्यार्थ्यांना शाडू मातीच्या आकर्षक गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. गणेशोत्सवात बाजारातून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती खरेदी केल्या जातात. त्या मूर्तींचे विसर्जन केल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. या बाबीचा मागोवा घेत मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या संकल्पनेतून “ प्रदूषणमुक्त गणेशोत्सव ” या शीर्षकाखाली हि कार्यशाळा घेण्यात आली तसेच विद्यार्थ्यामध्ये जनजागृती देखील करण्यात...

आंतरशालेय कॅरम स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे दोन विद्यार्थी चमकले

Image
जळगाव , ता. ३० : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील ऋत्विक अग्रवाल व महर्षी जोशी या विद्यार्थ्यांनी जैन स्पोर्टस अॅकडमी आयोजित तसेच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. पुरस्कृत 12 वर्षाखालील आंतरशालेय जैन चँलेंज जिल्हास्तरीय कॅरेम स्पर्धेमध्ये ऋत्विक अग्रवाल याला उपविजेते पद तर महर्षी जोशी याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले. तसेच याच स्पर्धेतील बॅडमिंटन या क्रीडाप्रकारात जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या २२ विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. याबद्दल या विद्यार्थ्यांचा स्कूलच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन विजयी विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या दरम्यान उपस्थित विध्यार्थी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी नमूद केले कि , जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी तसेच क्रीडाशिक्षक संजय चव्हाण व सर्व शिक्षकवृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी यासह सर्व पालक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या यशामागे या खेळाडूं...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

Image
हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या आठवणींना उजाळा ; स्कूलमध्ये विविध खेळांचे आयोजन जळगाव , ता. २९ : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये हॉकी या खेळाचे खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त ‘ राष्ट्रीय क्रीडा दिन ’ साजरा करण्यात आला. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी नमूद केले कि , मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन देशभरामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने शारीरिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी व नागरिक यांनी आपल्या जीवनामध्ये मैदानी खेळाला महत्त्व दिले पाहिजे. विविध खेळ खेळल्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. यश-अपयश पचवण्याची ताकद व्यक्तीमध्ये येते. चांगले आरोग्य हीच सर्वांची संपत्ती आहे हे आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वांनी दिवसभरातून किमान एक तास तरी खेळ खेळला पाहिजे असे मनोगत मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी व्यक्त केले. तसेच पाचवीची प्रग्याती मेहता हिने विद्यार...

जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग अ‍ॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालय आयोजित इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा उत्साहात

Image
दोन दिवसीय कार्यशाळेत ९५ विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचे गणपती ; या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक जळगाव , ता. २८ : मनातील विचारांना आकाराचे रूप देत विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणेशमूर्तीची अनेक रूपे साकारून आपल्यातील अनोख्या कलाविष्कारांचे सादरीकरण केले. निमित्त होते जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग अ‍ॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीसीए व एमसीए विभागातर्फे आयोजित ‘ पर्यावरणपूरक गणेशमूर्ती ’ बनविण्याच्या कार्यशाळेचे. महाविद्यालयातील कनिष्ट महाविद्यालयातील सभागृहात हि दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. याप्रसंगी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी नमूद केले कि , बीसीए व एमसीए विभागाचे कौतुक अश्यासाठी कि त्यांनी या युवकांना पर्यावरणाचे धडे दिले. कारण भविष्यात त्यांच्याच खांद्यावर देश घडविण्याची जबाबदारी आहे. आणि अश्या कामात महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी पुढाकार घ्यावा हे अभिनंदनीय आहे. त्यानी यावेळी उपक्रमाचे कौतुक करताना , विद्यार्थ्यांनी मातीच...

स्मार्ट इंडिया हॅकथॉन स्पर्धेत जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय देशात प्रथम

Image
“राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकथॉन ” स्पर्धेत जळगावचा ठसा ; मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले रायसोनीच्या विध्यार्थ्यांचे कौतुक जळगाव, ता. २७ : मानव संसाधन विकास मंत्रालया तर्फे घेण्यात आलेल्या ‘ स्मार्ट इंडिया हॅकथॉन ’ स्पर्धेत जळगाव शहरातील नामंकित जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत देशात प्रथम क्रमांक मिळवला असून , राष्ट्रीय स्तरावर आपल्या महाविद्यालयाचा ठसा उमटवला आहे.   “ऑल इंडिया कोंसील फॉर टेक्निकल एज्युकेशन” तर्फे नुकतीच ‘ स्मार्ट इंडिया हॅकथॉन-२०२२ ’ ही राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील प्राथमिक फेरीत खान्देशातील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संगणक अभियांत्रिकी विभाग व स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची निवड होत त्यांनी हॅकथॉन ’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती . तसेच भारताचा ७५ वा अमृत महोत्सवानिमित्ताने संपूर्ण भारतात ७५ नोडल सेंटरवर प्राथमिक फेरीत पात्र झालेल्या विध्यार्थ्यांना याठिकाणी बोलवण्यात आले होते त्यातील केरळ व इंदोर या नोडल सेंटरवर जी. एच. रायस...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे 'इन्वेस्टेचर सेरेमनी' चे मोठ्या दिमाखात आयोजन

Image
जळगाव , ता. २३ : सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे इन्वेस्टेचर सेरेमनी हा शालेय स्तरावरील अत्यंत महत्त्वाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी दशेतच आगामी नेतृत्व , ठराविक भूमिका व जबाबदाऱ्या सोपवून नेतृत्व गुणांच्या विकासासाठी प्रत्यक्ष अध्ययनाचा विद्यार्थ्यांना अनुभव देण्यासाठी इन्वेस्टीचर सेरीमनी नितांत गरजेची असते. शालेय जीवनात मिळालेल्या या संस्कारांमुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व प्रबलता येते व आगामी जीवनात संघ व्यवस्थापन कौशल्य व स्वयंशिस्त यांसारख्या जबाबदाऱ्या ते सक्षमपणे पार पाडू शकतील या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. अभिजीत राऊत यांच्या सौभाग्यवती सौ. डॉ. अनुराधा राऊत व सौ. ज्योत्स्ना रायसोनी या उपस्थित होत्या. तसेच सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी व  या व्यासपीठावर उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध पदांव...

संशोधनाची पद्धत ही संशोधनातील अविभाज्य घटक : प्रा. डॉ. प्रणव चरखा

Image
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “ रिसर्च मेथोडोलॉजी ” या विषयावर कार्यशाळा : विध्यार्थ्याचा मोठ्याप्रमाणात सहभाग जळगाव , ता. २२ : येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनिअरीग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट सेल अंतर्गत  इस्टीट्युट इनोव्हेशन कॉन्सिल व आयक्यूएसीच्या संयुक्त विद्यमाने संशोधन पद्धतीवर तीन दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. या कार्यशाळेला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून रायसोनी इस्टीट्युटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा तसेच इलेक्ट्रोनिक अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील , मॅकेनिकल विभागाचे प्रा. डॉ. दीपेन कुमार रजक , रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंटचे विभागप्रमुख प्रा. सौरभ गुप्ता व प्रा. मोनाली शर्मा हे उपस्थित होते. या प्रसंगी संशोधनातील तज्ज्ञ मार्गदर्शक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी विषय निवडीपासून ते शोधप्रकल्प , प्रबंध सादर करण्यापर्यंत संशोधन पद्धतीतील विविध महत्वाचे टप्पे सविस्तर उलगडून मांडले....

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात जल्लोषात रंगली तरुणाईची दहीहंडी

Image
  जळगाव ,  ता. २०  –    रंगीबेरंगी पोषाखात नटलेले राधा-कृष्णाच्या वेशातील विध्यार्थी  …  विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडी …  विविध गाण्यांचा गजर ….  हंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोष …  अशा उत्साही वातावरणात रायसोनी महाविद्यालयाच्या संगणक विभाग व विध्यार्थी कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दहीहंडीचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी दहीहंडी फोडणे, नृत्य ,  गायन व रॅप असे मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून गोकुळाष्टमी जल्लोषात साजरी केली. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी दहीहंडीचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. विध्यार्थ्याशी संवाद साधताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी प्रतिपादन केले की ,  आपण सर्व विध्यार्थ्यानी समाजात सामाजिक सलोखा जपून त्याद्वारे बंधुता व एकता जोपासणे खूप गरजेचे आहे तसेच युवकांमधील साहस वाढविणे ,  एकीचे महत्व पटवून देणे ...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये रंगली चिमुकल्यांची दहिहंडी

Image
  गोपाळकाला निमित्ताने दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरी जळगाव , ता. १९ : ‘ गोविंदा आला … रे आला ’ च्या गजरात श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत नृत्य करत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये चिमुकल्यांनी दहिहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा केला. या प्रसंगी रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी राधा कृष्णच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात केली. शाळेतील सर्व चिमुकल्यांनी राधा कृष्ण , गोपी-गोपिका यांच्या वेशभूषा करुन गरबा खेळला. यावेळी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये लहानपणापासून मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव दिले जातात. दहीहंडी का व कशी साजरी करतात याची माहिती घेऊन राधा व कृष्णाच्या वेशभूषेतील मुलांनी दहिहंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले तसेच राधांनी टिपऱ्यांचा फेर धरून आनंद साजरा केला तर , बालगोपाल दहिहंडी फोडण्यात चपळाई दाखवत होते.  ‘ मुलांच्यातील साहस वाढवणे , एकीचे महत्व पटवून देणे यासाठी दहिहंडीचा उपक्रम राबविण्यात आला. राधा व कृष्ण या व्यक्ती...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये नाट्य स्पर्धा उत्साहात संपन्न

Image
  जळगाव , ता. १७ : येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल मध्ये हेलनओग्रेडी इंटर नॅशनल ऑर्गेनाइजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच “ इंटर हाउस नाट्य स्पर्धा ” आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये “ सोशल मिडियाचे दुष्परिणाम ” या विषयावर पहिली ते आठवीच्या ८३ विद्यार्थ्यांनी चार लघुनाटिका सादर केल्यात. त्यात विध्यार्थ्यानी सोशल मिडिया वापराचे आधी व नंतरचे जीवन त्याचे फायदे व तोटे , सोशल मिडिया जसा युज कराल तसा परिणाम भोगाल तसेच सोशल मिडियामुळे तरुणाईची वाढती फसवणूक यासह विविध विषयावर सहभागी विध्यार्थ्यानी नाट्यछटा सादर करत आपल्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेचे उद्घाटन रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्याहस्ते करण्यात आले त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नमूद केले की , विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा , त्यांच्यातून नाट्य कलावंत निर्माण व्हावेत , नाटक करताना विद्यार्थ्यांमध्ये मनोरंजनाबरोबरच जीवनाकडे बघण्याची एक सकारात्मक दृष्टी निर्माण व्हावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते असे त्यांनी यावेळी सांगितले...