कारला जॅक न लावता काढता येणार पंक्चर ; वेळेची व श्रमाची होणार बचत

जी. एच. रायसोनीच्या विध्यार्थ्यानी ऑटोमेटिक कॉम्पॅक्ट जॅकचे दाखल केलेले पेटंट झाले प्रकाशित ; संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी केले विध्यार्थ्यांचे कौतुक

जळगाव, ता. ९ : सहलीला निघाल्यावर अथवा ग्रामीण भागातून प्रवास करताना काही वेळा एखाद्या खराब रस्त्यावर टोकेरी दगड, काच अथवा अन्य एखाद्या कारणाने टायर पंक्चर होते. चाकातील हवेचा दाब कमी होतो. टायरचे एअर प्रेशर कमी होताच गाडी चालवणे कठीण होते. अशा वेळी अनोळखी जागेवर पंक्चर काढून टायर दुरुस्त करुन घेणे ही एक मोठी कसरत असते. गाडी नियमित चालवणाऱ्या आणि लाँग ड्राइव्हवर जाणाऱ्या अनेकांना अशा प्रसंगाला कधी ना कधी सामोरे जावे लागते. या समस्येवर शहरातील जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपेन कुमार रजक यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम वर्षाचे विध्यार्थी ललित पाटील, सागर महाजन यांनी या समस्येवर उपाय शोधत स्वनिर्मित केलेल्या मॉडेलचे पेटंट प्रकाशित झाले आहे.

 

प्रामुख्याने खडबडीत रस्त्यावर दगड, काच, खिळा अशी एखाद्या टोकेरी किंवा धार असलेल्या वस्तूचा संपर्क झाल्याने टायर पंक्चर होते. पंक्चर टायर बदलून त्या जागेवर गाडीतील राखीव टायर जॅकच्या सहाय्याने लावणे हा पारंपारिक उपाय आहे. पण यात मोठ्याप्रमाणात श्रम घ्यावे लागतात तसेच हा प्रसंग एखाद्या महिलेवर किंवा वयोवृद्धावर ओढवल्यास त्यांची यावेळी मोठ्याप्रमाणात फजिती होते. या काळात प्रवासाच्या नियोजनावर मोठ्याप्रमाणात परिणाम होतो. पंक्चरची समस्या लवकर सोडवणे आवश्यक असते. पण वेळ कसा वाचवावा हे समजत नाही. पण या चिंतेवर आता एक सोपा उपाय करणे शक्य झाले आहे.

 

बटन दाबताच कॉम्पॅक्ट जॅकवर तरंगेल कार

विध्यार्थ्यानी ऑटोमोबाईलसाठी निर्मिती केलेले हे कॉम्पॅक्ट हायड्रॉलिक लिफ्ट यंत्रणा कारच्या चेसीसमध्ये फिट केले जाईल. हायड्रॉलिक जॅक ही एक प्रकारची भार उचलणारी यंत्रणा आहे, जी ऑपरेट केली जाते हायड्रॉलिक बलाने. या यंत्रणेत सिलिंडर व सेंटर पिन कॉम्पॅक्ट हायड्रॉलिक चा समावेश आहे. सेडान कार किंवा एसयूव्ही अशा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा शोध उपयुक्त ठरेल. या जॅक सिस्टमचे नियंत्रण ड्रायव्हर्सच्या केबिनमध्ये स्थित करण्यात येईल, चिखल किंवा खड्ड्यात अडकलेल्या कारला बाहेर खेचण्यास देखील हि यंत्रणा पूर्णपणे मदत करेल. हा शोध कोणत्याही प्रकारच्या कारमध्ये सहजपणे अॅक्सेसरी म्हणून बसवता येणार आहे.


अशी मिळाली प्रेरणा

यामागचा विशिष्ट हेतू सांगताना विध्यार्थी म्हणाले की, त्यांनी एकदा एका अनोळखी रस्त्यावर एका वयोवृद्ध व्यक्तीला मोठ्या कसरतीने पंक्चर झालेल्या कारचे टायर बदलतांना पहिले यावेळी त्याच्या भल्यामोठ्या कारचे पंक्चर झालेले टायर जॅकच्या सहाय्याने काढताना त्यांची होणारी दमछाक पाहून त्यांनी तातडीने त्यांना मदत करण्याचे ठरवले व टायर बदलून दिले पण अशा परिस्थितीत या वयोवृद्ध व्यक्तीचे झालेले हाल पाहून विध्यार्थ्यानी ऑटोमेटिक कॉम्पॅक्ट जॅकअसे उपकरण बनवण्याची योजना आखली जी कुठल्याही व्यक्तीचा स्मार्ट साथीदार बनून त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगातून त्यांना कमी वेळेत व कमी श्रमात यातून बाहेर काढेल व त्यांचा प्रवास सुखकर करेल. या अनुषगाने त्यांनी आपली भावना मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रा. डॉ. दीपेन कुमार रजक यांना बोलून दाखवली. त्यांचे मार्गदर्शन घेऊन सदर मॉडेल विकसित करत त्यांचे पेटंट दाखल केले.

 

संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी केले विध्यार्थ्यांचे कौतुक

विध्यार्थ्यानी नवनिर्मित केलेल्या ऑटोमेटिक कॉम्पॅक्ट जॅकबद्दल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री प्रितम रायसोनी यांनी या मॉडेलचे पेटंटधारक व महाविद्यालयातील विध्यार्थी ललित पाटील व सागर महाजन यांचे कौतुक करत "विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याची कर्तुत्ववान होण्याची चावी सापडली जी त्यांनी उत्कृष्ट सेवा घडवण्यासाठी वापरावी." असे मार्गदर्शन केले. तर संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी पुढील आयुष्यातील उज्वल भविष्यासाठी या विध्यार्थ्यांना शुभ संदेश दिला यावेळी अॅकड्मिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा हे देखील उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश