रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश

याही वर्षी विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी राखली महाविद्यालयाच्या १००  टक्के निकालाची परंपरा कायम

जळगावता.४ –  नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला असून यात जी.एच.रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत याही वर्षी रायसोनीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.   यात महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून राजनंदिनी उमाकांत पाटील हि विद्यार्थीनी प्रथम आली असून त्यास ७८.६७ टक्के मिळाले आहे. तसेच सिद्धांत जीतेद्र कोठारी हा विद्यार्थी ७८.३३ टक्के मिळवून द्वितीय तर हर्ष वासुदेव छतवाणी हा विद्यार्थी ७८ टक्के मिळवून तृतीय आला आहे. तसेच वाणिज्य वैष्णवी राजेंद्र झंवर हि विद्यार्थिनी ९३.३३ टक्के मिळवून प्रथम तर चारूल गणेश पाटील हि विद्यार्थीनी ९२.८३ टक्के मिळवून द्वितीय तसेच मोहक राहुल अग्रवाल हा विद्यार्थी ९०.६७ टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे.  यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना महविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांनी असे नमूद केले कि महाविद्यालयातील तज्ञ व अनुभवी प्राध्यापकसुसज्ज प्रयोगशाळानियमित वर्गनियमित सराव परीक्षाविद्यार्थ्यांच्या अध्ययनातील सातत्य तसेच परीक्षा काळातील प्रश्नांचा सराव घेतल्यामुळेविद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे सोपे झाले. याचेच फलीत म्हणून महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के  लागला. तसेच येणाऱ्या अकरावीबारावीच्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रायसोनी इन्स्टिट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनीसंचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद प्रा. मुकेश सदानशिव, प्रा. शितल किनगे, प्रा. मीनाक्षी पाटील, प्रा. नयना चौधरी  प्रा. गुंजन चौधरीप्रा. गायत्री भोईटेप्रा. राहुल यादवअनिल सोनार संतोष मिसाळ यांनी अभिनंदन केले.  

 

 

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश