जी. एच. रायसोनी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
जळगाव, ता. २१ : येथील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात मंगळवार ता. २१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व कर्मचारी व विध्यार्थ्यांमध्ये सकाळपासूनच नवचैतन्य निर्माण झाल्याने,महाविद्यालयाचा परिसर योगमय झाला होता. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत महाविद्यालयाचे डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा म्हणाले की, “योगा म्हणजे मनुष्याच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मीक विकासाची गुरुकिल्ली आहे, सर्वांनी नियमित योगसाधना करत या प्राचीन शास्त्राचे अगणीत फायदे शोधले पाहीजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगशास्त्राने अविभाज्य स्थान मिळवल्यावरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल असे सांगतानाच, योगसाधणेचे महत्व व विविध योगासनांची माहिती त्यां नी यावेळी दिली. यानंतर आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक ज्योती पटेल यांनी उपस्थितांना योगविषयी माहिती दिली. व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्युटचे क्रीडा संचालक प्रा. संजय जाधव यांनी योग प्रात्यक्षिके करुन दाखविली व त्यानुसार उपस्थितांनी योगाभ्यासातील सर्व आसनांची प्रशिक्षक ज्योती पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके केली. या कार्यक्रमाला रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. सोनल तिवारी, प्रा. मकरंद वाठ, प्रा. बिपासा पात्रा, प्रा. रफिक शेख, प्रा. तुषार पाटील, प्रा. स्वाती पाटील, प्रा. गणेश पाटील, रजिस्टार अरुण पाटील, प्रा. अविनाश पांचाळ, प्रा. हिरालाल सोळुंखे, प्रा. योगिता पाटील, प्रा.अविनाश खंबायत, प्रा. सौरभ गुप्ता, अजय चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, प्रा. राज कांकरिया, सचिन कुलकर्णी आदि उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले
Comments
Post a Comment