रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा

अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन ; विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती

फोटो ओळ :- कार्यशाळेप्रसंगी बोलताना पीबीएल ग्लोबल सोल्युशन प्रा.लिमिटेडचे सीईओ प्राजक्त पाटील व उपस्थित विध्यार्थी

जळगाव ता. १३ : येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील इस्टीट्युट इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा होता कि विद्यार्थ्यांना सुप्रसिद्ध व यशस्वी उद्योजकांसोबत संवाद साधायला मिळावा व मार्गदर्शन घडावे, विद्यार्थ्यांना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा मिळावी. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञाना सोबतच व्यावहारिक ज्ञान असणे हे सध्याच्या काळात आवश्यक आहे, याच अनुशंगाने महाविद्यालयातील इस्टीट्युट इनोव्हेशन कौन्सिलच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले हि कार्यशाळा अतिशय उपयुक्त व महत्वाचे ठरली. सदर कार्यक्रमासाठी पीबीएल ग्लोबल सोल्युशन प्रा.लिमिटेडचे सीईओ प्राजक्त पाटील हे मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासासहित नवीन व्यवसाय कसा सुरु करावा, व्यवसायाचे प्राथमिक स्वरूप कसे असावे, आर्थिक नियोजन कसे करावे तसेच यशस्वी उद्योजक कसा असावा, उद्योजकामध्ये काय गुण असणे आवश्यक आहेत अशा अनेक महत्वाच्या मुद्यांवर मार्गदर्शन केले व चर्चा केली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्या व्यवसायाच्या संकल्पना उपस्थित मान्यवरांसमोर मांडत अभियांत्रीकेतील उद्योजकता संदर्भातील विविध प्रश्न मार्गदर्शकाना विचारलीत. या कार्यक्रमाचे संयोजन इस्टीट्युट इनोव्हेशन कौन्सिलचे डीन प्रा डॉ. सौरभ गुप्ता यांनी केले. तर कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना रायसोनी इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांची होती तसेच या कार्यक्रमासाठी प्रा.तुषार पाटील, प्रा.जितेंद्र वडद्कर, प्रा.अविनाश खंबायत. प्रा.मयूर जाखेटे, प्रा. मोहित तौमर, प्रा. तुषार वाघ, प्रा. बिपीन भीमटे, प्रा. मुकेश पाल यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश