Posts

Showing posts from June, 2022

‘रायसोनी’च्या विद्यार्थ्यांची ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’मध्ये निवड

Image
केंद्र सरकारच्या उपक्रमातील स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेसाठी रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालायाच्या सहा विद्यार्थ्यांची निवड जळगाव , ता. ३० : स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२२ हा देशभरातील नामी संस्थांनांनी विद्यार्थ्यांसाठी तयार करून दिलेला मंच आहे. यात विद्यार्थी लाखोंच्या संख्येने सहभागी होतात व आपल्या नवकल्पनांचा , आपल्या कौशल्याचा वापर करून नवीन तंत्रज्ञान विकसित करतात. जेणेकरून मानवी जीवन सुखकर व सोयीस्कर होईल. तसेच तंत्रज्ञानासंबंधित येणाऱ्या विविध समस्यासाठी बाहेरच्या देशांवर अवलंबून न राहता आपल्याच देशात सर्व समस्याचे निराकरण झाले पाहिजे हा या स्पर्धेचा उद्धेश असून शासनाला येणाऱ्या विविध स्थानिक समस्याही या स्पर्धेत विध्यार्थी सोडवण्याचा प्रयत्न करतात तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही स्पर्धा घेतली जात असते. त्यात खान्देशातील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या स्पर्धेतील प्राथमिक फेरीत प्रकल्प प्रमुख म्हणून ऐश्वर्या लुणावत हिने काम बघितले तसेच , वरद साखरे , माधुरी घुगे , मोनिका महाजन , यश सोन...

रायसोनी पब्लिक स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Image
  जळगाव ,  ता. २१ : येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल मध्ये आज 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग ही भारताची प्राचीन व वैभवशाली परंपरा आहे. योगशास्त्राचे महत्त्व संपूर्ण जगाने ओळखले असून आरोग्यासाठी योगाचे महत्व लक्षात घेता संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून हा दिवस  ‘ आंतरराष्ट्रीय योग दिन ’  म्हणून  घोषित केला आहे.  रायसोनी पब्लिक स्कूल मध्ये सातत्याने विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देऊन दरवर्षी हा दिवस साजरा केल्या जातो. योगा नियमित केल्यामुळे मन व शरिराकरिता कोणकोणते फायदे आहेत ते योगासने केल्यानंतरच समजू शकते. योगदिनाचे महत्त्व लक्षात घेता स्कूल च्या प्रांगणात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या विविध आसने ,  ओंकार करून आंतरराष्ट्रीय योगदिनास आपला सक्रिय सहभाग दिला. विद्यार्थ्यांसाठी आयोजित या उपक्रमास योगप्रशिक्षक निशिता रंगलानी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. आपल्या मार्गदर्शनात योगप्रशिक्षक निशिता रंगलानी यांनी  ‘ मनाची एकाग्रता ताण त...

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Image
जळगाव , ता. २१ : येथील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात मंगळवार ता. २१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व कर्मचारी व विध्यार्थ्यांमध्ये सकाळपासूनच नवचैतन्य निर्माण झाल्याने , महाविद्यालयाचा परिसर योगमय झाला होता. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत महाविद्यालयाचे डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा म्हणाले की , “ योगा म्हणजे मनुष्याच्या शारीरिक , मानसिक व आध्यात्मीक विकासाची गुरुकिल्ली आहे , सर्वांनी नियमित योगसाधना करत या प्राचीन शास्त्राचे अगणीत फायदे शोधले पाहीजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगशास्त्राने अविभाज्य स्थान मिळवल्यावरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल असे सांगतानाच , योगसाधणेचे महत्व व विविध योगासनांची माहिती त्यां नी यावेळी दिली. यानंतर आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक ज्योती पटेल यांनी उपस्थितांना योगविषयी माहिती दिली. व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्युटचे क्रीडा संचालक प्रा. संजय जाधव यांनी योग प्रात्यक्षिके करुन दाखविली व त्यानुसार उपस्थितांनी योग...

“रायसोनी वंडर किड्स”मध्ये रंगला चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव

Image
पहिला दिवस : आईचं बोट धरून आले अन् शिक्षकांकडून अनोखे स्वागत पाहून चिमुकले भारावले ; विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत जळगाव , ता. २० : वर्गाच्या प्रवेशद्वारावर फुलांसह आंब्यांच्या पानांचे बांधलेले तोरण.. विद्यार्थ्यांचे स्वागत.. असे वातावरण शहरातील गणपती नगरातील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचलित रायसोनी वंडर किड्समधील चिमुकल्यांचा प्रवेशोत्सवावेळी पाहायला मिळाले. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलची वंडर किड्स हि प्राथमिक प्ले ग्रुप ते सिनिअर केजी स्कूल सोमवार ता. २० जूनपासून सुरू झाली. यावेळी नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती होती पण शिक्षकांकडून झालेले अनोखे स्वागत पाहून चिमुकले भारावले. तसेच शाळेच्या विश्वात पहिल्यांदाच पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांनी नव्याकोऱ्या गणवेशाची , नवीन वर्गाची , नवीन दप्तर-पाठ्यपुस्तकांची नवलाई अनुभवली. रायसोनी वंडर स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांनी वंडर किड्सच्या चिमुकल्यांचे अनोखे स्वागत केले. सौ. राजुल रायसोनी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत चॉकलेट दिले तसेच त्यांच्या हाताला धरून त्यांना स्कूलमध्ये ...

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुलमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट

Image
स्कूलच्या पहिल्या दिवशी:   रेन डान्स ,  घोड्याची सवारी व गुलाबपुष्प देवून चिमुकल्यांचं स्वागत जळगाव ,  ता. १५ :   सकाळचे प्रसन्न वातावरण... आई-वडिलांसोबत निघालेली मुलं.. तोरणं ,  फुलांनी सजवलेले स्कुलचे वर्ग ,  रांगोळ्यांची आरास ,  औक्षण करणारे शिक्षकवृंद ,  गुलाबपुष्प आणि चॉकलेट्सचे वाटप तसेच नवीन गणवेश ,  हे सर्व भारावलेले वातारण होते जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुलमधील रंगलेल्या पहिल्या दिवसाचे. आनंद ,  उत्साह ,  कुतूहल... अशा वातावरणात जी. एच. रायसोनी पब्लिक स्कुलची पहिली घंटा वाजली अन् ‘बॅक टू स्कूल’ साजरे झाले...   शाळेची वाट अन् उत्साहाचा थाट शाळेचा पहिला दिवस असल्याने काही विद्यार्थी स्कूलच्या बसेसने व काही आपल्या पालकांसह मोठ्या उत्साहात स्कुलमध्ये दाखल झाले होते. नवे-कोरे कपडे ,  कार्टुनचे दफ्तर ,  नवीन वॉटरबॉटल अशा साहित्यांसह विद्यार्थी मोठ्या उत्साहात स्कूलमध्ये उपस्थित झाले होते. सुटीचा मनसोक्त आनंद लुटल्यानंतर बुधवारी स्कुलच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता. यानंतर स्कूलमध...

रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा

Image
अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन ; विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती फोटो ओळ :- कार्यशाळेप्रसंगी बोलताना पीबीएल ग्लोबल सोल्युशन प्रा.लिमिटेडचे सीईओ प्राजक्त पाटील व उपस्थित विध्यार्थी जळगाव ता. १३ : येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील इस्टीट्युट इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा होता कि विद्यार्थ्यांना सुप्रसिद्ध व यशस्वी उद्योजकांसोबत संवाद साधायला मिळावा व मार्गदर्शन घडावे , विद्यार्थ्यांना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा मिळावी. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञाना सोबतच व्यावहारिक ज्ञान असणे हे सध्याच्या काळात आवश्यक आहे , याच अनुशंगाने महाविद्यालयातील इस्टीट्युट इनोव्हेशन कौन्सिलच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले हि कार्यशाळा अतिशय उपयुक्त व महत्वाचे ठरली. सदर कार्यक्रमासाठी पीबीएल ग्लोबल सोल्युशन प्रा.लिमिटेडचे सीईओ प्राजक्त पाटील हे मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासासहित नवीन व्यवसाय कसा सुरु करावा , व्यवसायाचे प्राथमि...

विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे : प्रा. डॉ. प्रणव चरखा

Image
रायसोनी महाविध्यालयात प्रथम वर्ष   अभियांत्रिकी ची   प्राध्या पक- पालक   सभा   संपन्न फोटो:- प्राध्यापक-पालक सभेप्रसंगी बोलताना रायसोनी इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा व उपस्थित पालक जळगाव , ता. ११ : येथील रायसोनी इस्टीट्यूट संचलित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सदर सभेसाठी रायसोनी इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा ,   प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडद्कर व प्राध्यापकवृंद तसेच प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सुरुवात प्रा. डॉ. अविनाश खंबायत यांच्या प्रेझेन्टेशनने झाली. त्यांनी   प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील विध्यार्थ्याच्या शैक्षणिक वाढीसाठी अध्यापनाची बदललेली पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर सभेचे समन्वयक व प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वडद्कर यांनी आपल्या प्रास्ताविकेत सदर सभेच्या आयोजनाचा उद्देश व हेतू स्पष्ट केला. तसेच महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यानंतर ...

रायसोनी इस्टीट्यूटच्या प्रा. सौरभ गुप्ता यांना पीएचडी प्रदान

Image
फोटो ओळ : प्रा. सौरभ गुप्ता यांचे पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देवून अभिनंदन करतांना अॅकडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा व इतर प्राध्यापकवृंद   जळगाव , ता. ३१ : रायसोनी इस्टीट्यूट येथील प्रा. सौरभ गुप्ता यांना नुकतीच गीतम विश्वविद्यालय , विशाखापट्टणम येथून “ पर्फोर्मन्स असिसमेंट ऑफ रूम एअर कंडीशनर विथ द हायड्रोकार्बन गॅस ” या विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली. ते जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिसिनेस मॅनेजमेंट येथे रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहे. त्यांनी "एसीतून निघणारा गॅस पर्यावरणाला घातक ठरू नये" या विषयावर सखोल संशोधन करून प्रबंध सादर केला. मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. पी. श्रीनिवास यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी , संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अॅकडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.  

रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश

Image
याही वर्षी विज्ञान व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी राखली महाविद्यालयाच्या १००    टक्के   निकाल ाची परंपरा कायम जळगाव ,  ता.४   –   नुकताच   बारावी चा   निकाल   जाहीर झाला असून यात जी.एच.रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या १०० टक्के   निकाल ाची परंपरा कायम राखत याही वर्षी रायसोनीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.     यात महाविद्यालयातील विज्ञान शाखेतून राजनंदिनी उमाकांत पाटील हि विद्यार्थी नी प्रथम आली असून त्यास ७८.६७ टक्के मिळाले आहे. तसेच सिद्धांत जीतेद्र कोठारी हा विद्यार्थी ७८.३३ टक्के मिळवून द्वितीय तर हर्ष वासुदेव छतवाणी हा विद्यार्थी ७८ टक्के मिळवून तृतीय आ ला आहे. तसेच वाणिज्य वैष्णवी राजेंद्र झंवर हि विद्यार्थिनी ९३.३३ टक्के मिळवून प्रथम तर चारूल गणेश पाटील हि विद्यार्थी नी ९२.८३ टक्के मिळवून द्वितीय तसेच मोहक राहुल अग्रवाल हा विद्यार्थी ९०.६७ टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे.    यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना महविद्यालयाच्या प्राचार्...