थ्रीडी प्रिंटीगने केली तिसऱ्या औद्योगिक क्रांतीला सुरुवात : खगेश देशपांडे

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात "थ्रीडी प्रिंटीग-जगाला अद्यावत बनविणारे तंत्रज्ञान" या विषयावर ऑनलाईन वेबिनार

फोटो ओळ : रायसोनी महाविध्यालयातील ऑनलाईन कार्यशाळेप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्रमुख पाहूणे पुणे येथील जिओक्लीड थ्रीडी प्रिंटीग सोल्युशनचे संचालक खगेश देशपांडे

जळगावता. २९ : येथील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयातील मॅकेनिकल विभागांतर्गत "थ्रीडी प्रिंटीग-जगाला अद्यावत बनविणारे तंत्रज्ञान" या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे येथील जिओक्लीड थ्रीडी प्रिंटीग सोल्युशनचे संचालक खगेश देशपांडे, रायसोनी बिजनेस मॅनेजमेटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखामॅकेनिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिपेन कुमार रजक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी आजच्या बदलत्या ओद्योगीक जगाचा आढावा घेत प्रत्येक तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. नुकतेच शास्त्रज्ञांनी थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारी जैव शाई ( Bio ink ) विकसित केली आहे. व्यवसायात टेक्नोलॉजीला किती महत्व आले आहे यांचे विविध उदाहरणं देत स्पष्ट केले तसेच आजच्या प्रत्येक व्यवसायात जर ठीकून राहायचे असेल तर टेक्नोलॉजीशिवाय पर्याय नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर कार्यशाळेचे प्रमुख पाहूणे व पुणे येथील जिओक्लीड थ्रीडी प्रिंटीग सोल्युशनचे संचालक खगेश देशपांडे यांनी आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात म्हटले किथ्री डी प्रिंटिंग म्हणजे अत्यंत सुस्पष्टता असलेल्या डिजिटल फाइलमधून थ्री-डी (त्रिमितीय) वस्तू बनविण्याची अद्ययावत प्रक्रिया. या तंत्रज्ञानाला मिश्रित पदार्थाची निर्मितीदेखील म्हणतात. कारण थ्री डी मुद्रित पदार्थ हे मिश्रित प्रक्रियेतून तयार होतात. उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही कच्चा मालाच्या आणि कम्प्युटरद्वारे तयार केलेल्या मॉडेलसह जवळपास कोणतीही गोष्ट तयार करता येते.  थ्री डी प्रिंट करण्यायोग्य मॉडेल्स एका संगणक - अनुदानित संकुलासह (CAD) संकुलएका थ्री डी स्कॅनरव्दारे किंवा साध्या डिजिटल कॅमेरा आणि फोटोग्रामामेट्री सॉफ्टवेअरद्वारे तयार केले जाऊ शकतात. थ्री डी छपाई हा जसे शिल्पकार हाताने आकार देत हवे तसे शिल्प तयार करतोतसा प्रकार आहे. फक्त यात जास्त अचूकता देणारे संगणक आधारित रेखाचित्राचा (CAD) वापर केला जातो. थोडी विचित्र गोष्ट अशी कीगुंतागुंतीच्या वस्तूंचे उत्पादन करणे यात स्वस्त पडतेतर कमी गुंतागुंतीच्या वस्तूंचे उत्पादन महाग पडते. या प्रकारच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर ग्राहकाभिमुख बदल करता येतात. येणाऱ्या काळात लोक एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीकडून वस्तू घेण्यापेक्षा स्वतःच बनवून घेतील. या प्रकारच्या उत्पादन पद्धतीत मोठ्या कंपन्यांऐवजी छोट्या कंपन्यांची भरभराट होईल. काही भविष्यदर्शी विचारवंतांनी म्हटले आहे कीही तिसऱ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात आहे. दुसऱ्या क्रांतीतील असेम्ब्ली लाइन उत्पादन मागे पडून त्याची जागा थ्री डी घेईल. सध्या थ्री डी छपाईचा वापर चॉकलेटपिझ्झाकपडेबूट यांच्यासाठी केला जात आहे. या छपाईचा खरा फायदा मोटारगाड्यायाट्रक व विमाने उत्पादन करताना होणार आहे. आरोग्य क्षेत्रातही शरीराचा एखादा भाग हुबेहूब बनवण्यासाठी (उदा. हाड किंवा कार्टिलेजच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया) याचा फायदा होईल. नुकतेच संशोधकांनी भ्रूण (स्टेम) पेशींचे एकसमान ब्लॉक्स तयार करण्यासाठी थ्री डी प्रिंटिंग पद्धती विकसित केली आहे. उच्च तंत्रात गर्भाशयाची निर्मिती करण्यासाठी या तंत्राला अजून सुधारित केले जाऊ शकतेज्यामुळे उतींचे पुनरुत्पादन करण्यासाठी आणि औषधांचा अभ्यास करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल. थ्री डी छपाईतून अगणित शक्यता निर्माण होणार असल्यातरी त्याला दुसरीही बाजू आहे. थ्री डी छपाई हा रोबोच्याही पुढचा प्रकार आहे. त्यामुळे कामगारच कायरोबोही बेरोजगार होण्याची भीती आहे. कारागिरांना याचा मोठा फटका बसेल. बौद्धिक संपदेचे वाद वाढतील. येणाऱ्या काळात मागणी गृहीत धरून होणारे उत्पादन बंद होईल व फक्त प्रत्यक्ष मागणी इतकेच उत्पादन होईल. लोक स्वतःला हवे तसे उत्पादन करू लागतील (उदा. बंदुका) अशीही शक्यता आहे. यात प्लास्टिकचा अतिवापर होतो व छपाईसाठी ऊर्जाही भरपूर लागतेअशीही टीका केली जाते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सदर ऑनलाईन कार्यशाळेत २०० विध्यार्थी सहभागी झाले होते. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. अमोल जोशी व प्रा. अविनाश पांचाळ यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश