राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त रायसोनी महाविध्यालयात विविध ऑनलाईन स्पर्धा

रायसोनी महाविध्यालयाच्या मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागाचा उपक्रम ; विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव, ता. १२ : जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालय येथे राजमाता जिजाऊ व विश्वविजेते स्वामी विवेकानंद यांची जयंती ऑनलाईन साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल या होत्या तर अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा व एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. मकरंद वाठ हे यावेळी उपस्थित होते. मॅनेजमेंट, अभियांत्रिकी व कनिष्ठ महाविध्यालय या तिन्ही विभागात घेतल्या गेलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. तसेच रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी या ऑनलाईन कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले कि, ज्या मातेने बालपणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बाळकडू रुजविले अशा रणरागिणी राष्ट्रमाता जिजाऊ व ज्यांच्या मुखातून अमेरिकेमध्ये उस्फूर्तपणे भारत भक्तीचे स्तोत्र स्फुरले व ध्यानप्रियता अध्ययनशिलता व चित्ताची पवित्रता या गुणांनी युक्त असणारे एक अद्भुत व्यक्तीमत्व ज्यांनी आपल्या ३९ वर्षांच्या अल्पकाळात मानवितेचे नवीन विचार नव भारताचा शोध, रामकृष्ण मिशनची स्थापना यासारखे अनेक कार्य केले, अशा महान व्यक्तिमत्त्व बद्दलचा आदर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या मनात साठवून ठेवावा. यावेळी वाद-विवाद स्पर्धा, पोस्टर प्रेझेन्टेशन, निबंध लेखन यासारख्या विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात पोस्टर प्रेझेन्टेशन या स्पर्धेत “रोल ऑफ युथ” पास्ट, प्रेझेंट अॅन्ड फ्युचर हा तसेच क्लीन इंडिया-ग्रीन इंडिया हे दोन विषय विध्यार्थ्यांना देण्यात आले होते तर वाद-विवाद स्पर्थेत रोल ऑफ टुडे युथ इन प्रेझेंट स्कॅनीरीओ तर अॅनी टाॅपीक अबाउट युथ हे दोन विषय विध्यार्थ्यांना देण्यात आले होते तर निबंध लेखन या स्पर्धेत स्वामी विवेकानंद एक्सपेक्टेशन फॉर्म द यंग व आत्मनिर्भर भारत हे विषय देण्यात आले होते. यावेळी पोस्टर प्रेझेन्टेशन या स्पर्धेत गणेश पाटील हा विध्यार्थी प्रथम तर अनुष्का जाधव ही विध्यार्थीनी  द्वितीय आली तसेच वक्तृत्व स्पर्धेत भूषण अडकमोल, शाहनवाज सय्यद व दक्षता महांगडे या विध्यार्थ्यानी यश संपादन केले   कार्यक्रमासाठी स्टुडंट कॉन्सील व प्रा. वसिम पटेल यांनी सहकार्य केले. तसेच शाहनवाज सय्यद यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले  या ऑनलाईन कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रीतमजी रायसोनी यांनी कौतुक केले    

Comments

Popular posts from this blog

‘गॅलेक्सी पेंटिंग’ स्पर्धेतून विद्यार्थ्यांना “अंतराळ सर्जनशीलतेची नवी दिशा” : संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल

जी. एच. रायसोनी महाविध्यालयात इनोव्हेटिव्ह “प्रोजेक्ट एक्सबिशन”

जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश