जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘भारतीय भाषा दिवस’ उत्साहात साजरा
UGC निर्देशानुसार मातृभाषांच्या जपणुकीचा संकल्प : विद्यार्थ्यांनी मांडले भाषिक वैविध्य जळगाव , ता. १२ : भारतीय भाषांचे संवर्धन आणि भाषिक ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ( UGC) देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांना दरवर्षी ११ डिसेंबर रोजी ‘भारतीय भाषा दिवस’ साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जी. एच. रायसोनी महाविद्यालयात उत्साहात ‘भारतीय भाषा दिवस’ साजरा करण्यात आला. या उपक्रमात अध्यक्षस्थानी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे होते तर व्यासपीठावर अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढद्कर हे उपस्थित होते. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी बहुभाषिक शिक्षणाचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासातील महत्त्व स्पष्ट केले. महाविद्यालयात तीन भाषांचा अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांना क्रेडिट गुण मिळतात , याची माहिती देत त्यांनी तीन भाषांवरील प्रावीण्य आजच्या शिक्षणप्रणालीत किती उपयुक्त आहे , यावर प्रकाश टाकला. त्या म्ह...
Comments
Post a Comment