रायसोनी इस्टीट्यूटच्या प्रा. सोनल पाटील यांना पीएचडी प्रदान
फोटो ओळ : प्रा. सोनल पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा व इतर प्राध्यापकवृंद
जळगाव, ता. ३१ : रायसोनी इस्टीट्यूट येथील प्रा. सोनल पाटील यांना नुकतीच सरदार वल्लभभाई नॅशनल इस्टीट्यूट टेक्नोलॉजी सुरत येथून कॉम्युटर सायन्स अॅन्ड इंजीनियरिग या विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली. त्या जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिसिनेस मॅनेजमेंट येथे संगणकशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्यांनी "फोटो व व्हिडिओमधील फेरफार शोधून काढणे" या विषयावर सखोल संशोधन करून प्रबंध सादर केला. मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. कृपा जरीवाला यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्या डॉ. पी. के. पाटील व सौ. सुरेखा पाटील यांच्या सुकन्या आहेत.
Comments
Post a Comment